Mobile Price Hike: मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ! कोणत्या कंपनीचे मोबाईल किती रुपयांनी महाग? पाहा लिस्ट

Mobile Phone Price Hike: एप्रिल महिन्यात मोबाईल ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला असून, सॅमसंग, शाओमी आणि ओप्पोसह सर्वच मोठ्या ब्रँड्सनी आपल्या फोनच्या किमती 3% ते 22% पर्यंत वाढवल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mobile Phone Price Hike: तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन (AIMRA) आणि डीलर्सकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जवळपास सर्वच आघाडीच्या मोबाईल ब्रँड्सनी आपल्या किमतीत मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत काही ब्रँड्सच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

कोणत्या ब्रँडचे फोन किती महागले? (एप्रिलमधील वाढ)

  • सॅमसंग (Samsung): 3% ते 22% वाढ.
  • शाओमी (Xiaomi): 3% ते 15% वाढ.
  • ओप्पो (OPPO) व पोको (POCO): 6% ते 18% पर्यंत वाढ.
  • नथिंग (Nothing Phone): 13% ते 14% वाढ.
  • मोटोरोला (Motorola): 4% ते 9% वाढ.
  • विवो (Vivo): 15 एप्रिलपासून दरवाढ अपेक्षित.
  • ॲपल (Apple): आयफोन 15 आणि 16 वरील 5000 रुपयांची सवलत बंद करण्यात आली आहे. तसेच आयफोन 17 वरील कॅशबॅक 6000 वरून थेट 1000 रुपयांवर आणला आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...)

दरवाढीची मुख्य 4 कारणे

  1. एआय चिप टंचाई: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापरामुळे चिप्सची मागणी वाढली असून पुरवठा कमी असल्याने किमती वाढल्या आहेत.
  2. खाडी देशांतील संघर्ष: मध्यपूर्वेतील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून मालवाहतूक (Freight) आणि विमा खर्च वाढला आहे.
  3. रुपयाची घसरण: डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात केलेल्या सुट्या भागांचा खर्च वाढला आहे.
  4. कच्च्या मालाचे दर:  प्लास्टिक आणि मेमरी कंपोनंट्सच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादनाचा खर्च वाढला आहे.

ग्राहकांचा कल 'सेकंड हँड' फोनकडे

मोबाईलच्या किमती वाढल्याने मार्च महिन्यात मोबाईल विक्रीत 30 टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहक आता नवीन फोन घेण्यासाठी किमती कमी होण्याची वाट पाहत आहेत किंवा जुन्या (Second hand) फोनला पसंती देत आहेत. AIMRA च्या मते, मोबाईलच्या किमतीत वाढ होण्याचा हा कल 2027 पर्यंत कायम राहू शकतो.

Advertisement

(नक्की वाचा-  Iran-US War: जगाला दुहेही धक्का! इराणनंतर आता अमेरिकेकडूनही होर्मुजवर नाकेबंदी; युद्ध पुन्हा भडकणार?)

शेअर बाजार आणि डिक्सन टेक

हँडसेटच्या किमती वाढत असताना, मोबाईल निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज (Dixon Technologies) कडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या दरवाढीचा कंपनीच्या नफ्यावर काय परिणाम होतो, याकडे बाजारतज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.
 

Topics mentioned in this article