- पावसाळ्यात पालक आणि फ्लॉवरसारख्या भाज्यांमध्ये दमट वातावरणामुळे बॅक्टेरिया आणि कीटक वाढण्याचा धोका जास्त असतो
- मशरूम योग्य प्रकारे साठवले नाहीत तर त्यात बुरशी आणि बॅक्टेरिया वाढून पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
- दुधी भोपळा पावसाळ्यात पचनासाठी उपयुक्त असून शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतो
Monsoon Diet Tips: पावसाळा ऋतू जितका सुंदर वाटतो, तितकाच हा ऋतू संसर्ग (Infection) आणि पचनाशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढवतो. हवेत जास्त दमटपणा असल्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी (फंगस) आणि कीटकांची निर्मिती वेगाने होते. याच कारणामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टींचे काळजीपूर्वक सेवन केले पाहिजे, याबाबत अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलने आपल्या सोशल मीडिया हँडलवर माहिती शेअर केली आहे. यामध्ये पालक, फ्लॉवर आणि मशरूम यासारख्या भाज्यांचा समावेश आहे. कारण ओलसरपणामुळे या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया, बुरशी किंवा कीटक वाढण्याची शक्यता जास्त असते. तर दुसरीकडे दुधी भोपळा, भोपळा, मका (कॉर्न), डाळी आणि चणे यासारख्या गोष्टी या ऋतूत शरीरासाठी उत्तम पर्याय मानल्या जातात. या गोष्टी शरीराला केवळ आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा करत नाहीत तर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासही मदत करू शकतात.
1. पावसाळ्यात पालक का खाऊ नये?
पालकमध्ये लोह आणि व्हिटॅमिन्सचा साठा मोठ्या प्रमाणात असतो, पण पावसाळ्यात पालकवर माती आणि कीटक सहज चिकटतात. दमट वातावरणामुळे यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही जास्त असतो. जर पालक चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाही, तर पोट खराब होणे, गॅस आणि इन्फेक्शन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
2 .फ्लॉवर खाणे का टाळावे?
फ्लॉवरची रचना अशी असते की ज्यामध्ये छोटे-छोटे कीटक आणि घाण सहज लपून राहू शकते. पावसाळ्याच्या दिवसात यातील कीटकांची संख्या वाढते. याशिवाय फ्लॉवरमुळे काही लोकांमध्ये गॅस आणि ब्लोटिंगची (पोट फुगणे) समस्या देखील वाढू शकते.
3. मशरूम का ठरू शकते त्रासाचे कारण?
पावसाळ्यात जर मशरूमची गुणवत्ता (क्वालिटी) चांगली नसेल किंवा ते योग्य पद्धतीने साठवले गेले नसेल तर त्यात बुरशी आणि बॅक्टेरिया तयार होऊ शकतात, ज्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका वाढू शकतो.
(नक्की वाचा : Footwear Odor Removal: पावसाळ्यात बुटांना सडल्यासारखा घाणेरडा वास येतोय का? फॉलो करा या 4 टिप्स, वास होईल कमी)
4. दुधी भोपळा पावसाळ्यातील सुपरफूड का आहे?
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ही भाजी अतिशय सहजरित्या पचते ज्यामुळे पोटावर जास्त ताण येत नाही.
5. भोपळा खाण्याचे फायदे
भोपळा हे व्हिटॅमिन ए, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. इतकेच नव्हे तर भोपळा देखील पचनास हलका असतो आणि दीर्घकाळ शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो.
6. मका (कॉर्न) पावसाळ्याची ओळख का आहे?
मक्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि शरीरास आवश्यक असणाऱ्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते.
(नक्की वाचा: पावसाळ्यात सांधेदुखी,अंग आखडण्याच्या समस्येने हैराण आहात? निरोगी आरोग्यासाठी डॉ धामणकरांनी सांगितल्या 8 टिप्स)
7. डाळी आणि चणे का गरजेचे आहेत?
डाळी आणि चणे हे प्रोटीनचे (प्रथिनांचे) उत्तम स्रोत आहेत. पावसाळ्यात जेव्हा इन्फेक्शनचा धोका वाढतो, तेव्हा शरीर मजबूत ठेवण्यासाठी पुरेसे प्रोटीन आवश्यक असते. अशा वेळी डाळी सहज पचतात. तर चण्यांमध्ये फायबर आणि पोषक तत्त्वांचा मोठा साठा असतो, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)