Morning Routine Tips: रात्री पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यानंतरही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर थकल्यासारखे जाणवते का? अंथरुणातून बाहेरच येऊ नये आणि शरीरात ताकद नसल्यासारखे जाणवते का? जर या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेल तर तुम्ही एकटे या समस्येचा सामना करत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात ही समस्या खूप सामान्य झाली आहे. लोक दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी चहा किंवा कॉफीचा आधार घेतात पण त्याचा परिणाम काही काळापुरताच मर्यादित राहतो.
तुमचा दिवस सुरू झाल्यानंतर तुम्ही पहिला तास कसा घालवता? यामध्येच दिवसभर तुमचे अॅक्टिव्ह राहण्याचे सीक्रेट दडलंय. जर तुम्ही सकाळची सुरुवात योग्य सवयींनी केली तर कोणत्याही कॅफिनशिवाय (चहा-कॉफी) तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांनी सांगितलेले तीन सोप्या मॉर्निंग हॅक्स.
दिवसभर उत्साही आणि फ्रेश राहण्यासाठी फॉलो करा हे 3 टिप्स
1. एक ग्लास पाणी
सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात पाण्याची किंचित कमतरता (Dehydration) निर्माण होते. थकवा आणि डोके जड होणे हे पाण्याच्या कमतरतेचे सर्वात पहिले लक्षणं आहे. म्हणूनच सकाळी डोळे उघडताच चहा किंवा कॉफीऐवजी एक मोठा ग्लास साधे किंवा कोमट पाणी प्यावे. हे तुमच्या संथ झालेल्या मेटाबॉलिज्मची (पचनक्रिया) गती वाढवते आणि मेंदूला सक्रिय होण्याचा संदेश देते.
2. सकाळचे कोवळे ऊन
सकळचा नैसर्गिक प्रकाश म्हणजेच ऊन आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती थांबते, हे हार्मोन झोपेसाठी आवश्यक असते. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराचे नैसर्गिक घड्याळ (Circadian Rhythm) योग्य पद्धतीने काम करू लागते ज्यामुळे आळस त्वरित गायब होतो.
(नक्की वाचा: Vitamin D Foods: कोवळ्या उन्हाशिवाय शरीराला कसं मिळणार व्हिटॅमिन डी? डाएटमध्ये या 3 गोष्टींचा करा समावेश)
3. वर्कआऊट
सकाळी उठून कठीण स्वरुपातील वर्कआऊट करण्याची गरज नाही. अंथरूण सोडल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी हलके स्ट्रेचिंग करा, योगासने करा किंवा घरातच थोडा वेळ फेरफटका मारा. जेव्हा तुम्ही शरीराची हालचाल करता तेव्हा रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. यामुळे तुमच्या स्नायूंना आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तुम्हाला त्वरित फ्रेश आणि ॲक्टिव्ह वाटू लागते.
(नक्की वाचा: High Uric Acid: हाय युरिक ॲसिड समस्या असल्यास डाळ खावी की नाही? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला)
संशोधन काय सांगते?
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (University of California, Berkeley Study) च्या या संशोधनानुसार, सकाळी उठल्यावर उत्साही वाटणे हे पूर्णपणे आपल्या सकाळच्या सवयींवर जसे की योग्य नाश्ता आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते, अनुवांशिकतेवर (जेनेटिक्सवर) नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)