Success Mantra: आपण आयुष्यात यशस्वी (Success) व्हावं ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यशस्वी झाल्यानंतरच आर्थिक परिस्थिती ही चांगली होती. स्वत:ला आणि कुटुंबीयांना खूश ठेवता येतं. काही जण जितके कष्ट घेतात त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही. त्यामुळे ते निराश होतात. या व्यक्तींनी दिवसाची सुरुवात (Morning Tips) काही खास उपायांनी केली तर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. त्याचबरोबर त्यांच्यासाठी यशाचे दरवाजेही उघडले जाऊ शकतात.
सकाळी उठल्यानंतर काही गोष्टी नियमित केल्या तर तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटून दिवस चांगला जाऊ शकतो.
सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात जोडून या मंत्राचा जप करा
कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती
करमूल स्थितो ब्रह्मा
प्रभाते करदरशनम्
आराध्य देवताचे स्मरण
त्यानंतर आपले मन एकाग्रचित्त करत आराध्य देवताचे स्मरण करावे. आपला दिवस सुखाचा जाण्यासाठी त्यांची प्रार्थना करा
सूर्याला अर्घ्य
सकाळी आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवतेला अर्घ्य द्या आणि या मंत्राचा जप करा
ओम सूर्याय नम:
ओम भानवे नम:
ओम खगाय नम:
या मंत्रजपानं आर्थिक अडचणी दूर होतात.
संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग करा
त्यानंतर शांतपणे संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग करा. कामाच्या महत्त्वानुसार त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण नियोजन आगोदरच केल्यास ऐनवेळी कोणताही गोंधळ होणार नाही. त्यामुळे तुमची सर्व कामं शांतपणे आणि नियोजित वेळेत पूर्ण होतील.
(स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV मराठी याची पृष्टी करत नाही.)