Nag Panchami 2024: नागपंचमीचा हा आहे अमृत मुहूर्त, या मंत्राने पूजा सुरू केल्यास मिळतील मोठे लाभ

Nag Panchami Puja: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा सिद्ध योग आणि साध्य योग जुळून आल्याने नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nag Panchami 2024 : नागपंचमीचा शुभ मुहूर्त

Nag Panchami 2024: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा (Nag Panchami) सण साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 9 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या (Nag Panchami)  दिवशी भगवान शिवशंकर, माता पार्वती आणि नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या (Nag Panchami 2024)  दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि नागदेवतेची पूजा केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख-समृद्धी वाढते, असे म्हणतात. यंदा नागपंचमीच्या दिवशी सिद्ध योग आणि साध्य योग जुळून आल्याने पूजेच्या मुहूर्ताचे महत्त्व अधिक वाढले आहे. पूजेसाठी मुहूर्ताला खूप महत्त्व असते. शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास उत्तम लाभ मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नागपंचमीच्या दिवशीही भगवान शंकर, माता पार्वती आणि नागदेवतेची शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास लाभ मिळतील,असे मानतात. नागपंचमीच्या दिवशी पूजा (Pujan Muhurat On Nagpanchami) करण्याची सर्वात उत्तम वेळ कोणती आहे? जाणून घेऊया माहिती... 

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

पंचमी तिथी

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी सुरू होऊन 10 ऑगस्ट शनिवारी पहाटे 3 वाजून 14 मिनिटापर्यंत असेल. 

Advertisement

सिद्ध योग आणि साध्य योग

नागपंचमीच्या दिवशी 9 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 46 मिनिटांपर्यंत सिद्ध योग आहे आणि यानंतर साध्य योग सुरू होईल.
साध्य योग 10 ऑगस्ट शनिवारी दुपारी 2 वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

नागपंचमीचे चौघडिया मुहूर्त

  • नागपंचमीच्या दिवशी चौघडिया मुहूर्तामध्ये लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 7 वाजून 26 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. 
  • अमृत सर्वोतम मुहूर्त सकाळी 9 वाजून 6 मिनिटांपासून ते सकाळी  10 वाजून 46 मिनिटांपर्यंत आहे.
  • नागपंचमीच्या दिवशी 2 तास 45 मिनिटांचा वेळ पूजेसाठी सर्वोत उत्तम आहे. या काळादरम्यान भगवान शंकर, माता पार्वती आणि नाग देवतेची पूजा केल्यास सर्वात उत्तम लाभ मिळू शकतात. 

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

नागपंचमी पूजन मंत्र

सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले।
ये च हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।।
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:।
ये च वापीतडगेषु तेषु सर्वेषु वै नम:।।

Advertisement

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पॅरिस ऑलिम्पिक गाजवणाऱ्या स्वप्नील कुसाळेची पुण्यात जंगी मिरवणूक

Topics mentioned in this article