Nag Panchami 2024: नागपंचमीला या मान्यतेमुळे घरात पोळ्या करणे टाळतात? जाणून घ्या काय आहे धार्मिक कारण

Nag Panchami Date: यंदा 9 ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. पण या सणाच्या दिवशी घरामध्ये पोळ्या करणे टाळण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या यामागील खास कारण...

Advertisement
Read Time: 2 mins
N

Nag Panchami 2024: नागपंचमी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पंचांगानुसार दरवर्षी नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते आणि यंदा ही तिथी 9 ऑगस्ट रोजी आली आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. नागदेवतेला दूध अर्पण करून नागपंचमीची पूजा केली जाईल. नागपंचमी सणाशी संबंधित अनेक मान्यता आहेत आणि यापैकीच एक मान्यता अशी आहे की, या दिवशी तव्यावर कोणतेही अन्नपदार्थ भाजले जात नाहीत अथवा शिजवले जात नाहीत. काय आहे यामागील नेमके कारण? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

नागपंचमीच्या दिवशी पोळ्या का तयार केल्या जात नाहीत? (Why You Should Not Make Roti On Nag Panchami)

नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तूंचा वापर करणे शुभ मानले जात नाही, त्यामुळे या दिवशी लोखंड वर्ज्य असते. बहुतांश घरांमध्ये लोखंडी तव्याचा वापर केला जातो, पण नागपंचमीला तव्यावर पोळी शेकली जात नाही. दुसरे कारण म्हणजे तव्याला नागाच्या फण्याशी जोडले जाते. यामुळे देखील अग्नीवर तवा ठेवला जात नाही. कारण असे केल्यास नागदेवता नाराज होऊ शकते, असे मानले जाते.

(Nag Panchami 2024: नागपंचमीचा हा आहे अमृत मुहूर्त, या मंत्राने पूजा सुरू केल्यास मिळतील मोठे लाभ)

राहू दोष निर्माण होऊ शकतात?

पोळ्या न करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे तवा हे राहुचे (Rahu) प्रतीक मानले जाते. नागपंचमीच्या मुहूर्तावर तव्याचा वापर केल्यास कुंडलीमध्ये राहू ग्रहाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असते आणि राहू दोषही निर्माण होऊ शकतात. या कारणांमुळे नागपंचमीच्या दिवशी पोळी तयार करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. नागपंचमीला घरामध्ये पोळ्या तयार केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

शीतला अष्टमीलाही पोळ्या तयार करत नाही, कारण... 

नागपंचमी सणाव्यतिरिक्त शीतला अष्टमीच्या दिवशीही घरामध्ये तव्यावर पोळी अथवा अन्य खाद्यपदार्थ तयार केले जात नाहीत. तसेच या दिवशी शिळे अन्न देखील खाल्ले जात नाही. 

Advertisement

(नक्की वाचा: Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

या तिथीच्या दिवशी पोळ्या करणे वर्ज्य

धार्मिक मान्यतांनुसार, मकर संक्रांती, कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी सणाच्या दिवशीही पोळ्या तयार करणे वर्ज्य केले जाते. या सणांदरम्यान बहुतांश लोक घरामध्ये पोळ्या तयार करत नाहीत. दरम्यान प्रत्येक व्यक्ती आपापल्या धार्मिक मान्यतांचे अनुकरण आणि पालन करतात.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं नांदेडच्या गुरुद्वारेचं दर्शन 

Topics mentioned in this article