Nag Panchami 2025: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा, महत्त्व जाणून घ्या

Nag Panchami 2025 Date: नागपंचमी सण यंदा कधी आहे, पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे? सर्व माहिती एका क्लिकवर जाणून घ्या...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Nag Panchami 2025 Date: नागपंचमी तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या"

Nag Panchami 2025 Date:  हिंदू धर्मामध्ये नागपंचमी सणाचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची विधीवत पूजा केल्यास फलप्राप्ती होते, असे म्हणतात. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास जीवनातील दुःख आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळते, असेही म्हणतात. नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व असते. या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते. शिवाय भावाच्या संरक्षणासाठीही नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवासही करण्याची प्रथा आहे. यंदा नागपंचमी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त यासह सर्व माहिती जाणून घेऊया...

नागपंचमी कधी आहे?| Nag Panchami 2025 Date | Nag Panchami Kadhi Ahe?

पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीचा शुभारंभ 28 जुलै सकाळी 11.24 वाजता होईल आणि 29 जुलैला 12.46 (AM) वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार यंदा नागपंचमी 29 जुलै रोजी साजरी केली जाईल.

Advertisement

नागपंचमीचे पूजा साहित्य (Nag Panchami 2025 Puja Samagri)

  • नागदेवतेची मूर्ती किंवा फोटो
  • पाणी,दूध
  • तांदूळ,चणे, साखर
  • लाह्या, हळदकुंकू
  • बेलाची पाने, दुर्वा, वस्त्रमाळा, विड्याची पाने, सुपारी नाणी, फुले
  • चार फळे, कापूर, धूप, अगरबत्ती, दिवा 

नागपंचमीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त  (Nag Panchami 2025 Shubh Muhurat)

29 जुलै : नागपंचमी 2025 

सकाळी 5.41 वाजेपासून ते सकाळी 8.23 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Shravan 2025 Vrat Importance: श्रावणातील शिवपूजनाचे महत्त्व, नक्त व्रत आणि या 2 तिथीला अभिषेक करणे ठरेल फलदायी)

नागपंचमीची पूजा कशी करावी? (Nag Panchami 2025 Puja Vidhi)

  • पहाटे उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. 
  • घरामध्ये स्वच्छ पाटावर चंदनाने किंवा हळदी कुंकू मिश्रणाने पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून प्रतिमेची किंवा नागदेवतेच्या मातीच्या मूर्तीची पूजा करावी. 
  • नऊ नागांची नावे घेऊन फुले अर्पण करा. (अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया) अनंतादी नागेभ्योनम: अशी नावे घेऊन पूजा करावी. 
  • फुले दुर्वा लाह्या हरभरे अर्पण करावे.

(नक्की वाचा: Shravan 2025 Horoscope:श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय)

नागदेवतेची पूजा करताना कोणता श्लोक म्हणावा?

श्रावणे शुक्ल पंचम्यां यत्कृत नाग पुजनम् | 
तेन तृप्यंतु मे नागा भवंतु सुखदा: सदा || 
कज्ञानात् ज्ञानतो वापी यन्मया पुजनं कृतम् | 
न्युनातिरिक्तं तत्सर्वं भो नागा: क्षन्तुमर्हथ || 
युष्मत् प्रसादात् सफला मम सन्तु मनोरथा:| 
सर्वदा मत्कुले माsस्तु भयं सप्रविषोद्भवम् || 

Advertisement
नागपंचमीची कथा (Nag Panchami 2025 Katha)

पौराणिक कथेनुसार राजा परीक्षितला सापदंशाने मृत्यू होण्याचा शाप मिळाला होता. शमिक ऋषींचा मुलगा श्रृंगी ऋषींनी त्याला हा शाप दिला होता. यानुसार तक्षक नागाच्या दंशाने परीक्षित राजाचा मृत्यू देखील झाला होता. यानंतर परीक्षित राजाचा मुलगा जन्मेजयने सर्व नागांचा नाश करण्यासाठी नागदाह यज्ञ केले होते. यामुळे सर्व साप यज्ञामध्ये येऊन भस्मसात लागले पण तक्षक नागाने इंद्रदेवाच्या सिंहासनाला विळखा घातला. यज्ञाच्या प्रभावाने ज्या सिंहासनाला तक्षक नागाने विळखा घातला होता, तो हलू लागला. तेव्हा आस्तिक मुनींनी हस्तक्षेप करत राजा जन्मेजयला यज्ञ थांबवण्यासाठी तयार केले. आस्तिक मुनींच्या प्रयत्नाने सर्प प्रजातींचे अस्तित्व तर बचावले पण त्यावेळेस कित्येक सर्प आगीमध्ये जळत असल्याने वेदना सहन करत होते. या वेदना शांत करण्यासाठी कच्च्या दुधाची मदत घेण्यात आली. याच दिवसापासून नागदेवतीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात. 

(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)

नागपंचमीची पूजा केल्यास कोणते लाभ मिळतील? 
  • कालसर्प दोष दूर होण्यास मदत मिळेल. 
  • कुंडलीतील राहु आणि केतुशी संबंधित दोषांपासून मुक्तता मिळेल. 
  • मनातील इच्छा पूर्ण होतील आणि जीवनामध्ये सुख-समृद्धी येईल, असेही म्हणतात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)