Nag Panchami 2025: नागपंचमीला नागदेवतेच्या दर्शनाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते? कसा मिळेल आशीर्वाद, जाणून घ्या

Nag Panchami 2025: नागपंचमीला नागदेवतेची पूजा का केली जाते? नागदेवतेची पूजा केल्यास कोणते लाभ मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nag Panchami 2025 : नागदेवतेचे दर्शन न झाल्यास..."

Nag Panchami 2025 Date: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. मान्यतांनुसार नागदेवतेची पूजा केल्यास सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. जीवनात शत्रू आणि सर्पदंशाचे भय राहत नाही. पंचांगानुसार यंदा 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. नागदेवतेची पूजा केल्यास धार्मिक आणि वास्तूशी संबंधित कोणते लाभ मिळतात? नागदेवतेचे दर्शन न झाल्यास कशी पूजा करावी? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया...  

Nag Panchami 2025 Date नागदेवतेच दर्शन न झाल्यास...

प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. राज मिश्रा यांच्या माहितीनुसार, नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याचे कोणतेही विधान नाहीय. म्हणून नागदेवतेचे दर्शन न झाल्यास निराश होऊ नका. भगवान शंकराच्या मंदिरामध्येही जाऊनही तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता. मंदिरामध्ये जाणे शक्य नसल्यास घरामध्येच नागदेवतेच्या मातीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करावी. 

जर हे देखील शक्य नसल्यास आदिगुरु शंकराचार्य यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, नागदेवतेची मानस पूजा करू शकता. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांचे स्मरण करून त्यांच्या पूजेची भावना मनामध्ये बाळगली तर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा, महत्त्व जाणून घ्या)

Nag Panchami 2025 नागदेवतेच्या पूजेचे लाभ 

  • नागदेवतेची पूजा केल्यास धर्म शास्त्र तसेच वास्तूशास्त्रानुसार शुभ फळ मिळतील. 
  • सनातन परंपरांनुसार सापांना देवांसमान मानले जाते, म्हणूनच त्यांना नागदेवता म्हणतात. 
  • हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पृथ्वीचा संपूर्ण भार शेषनागाने उचलून धरलाय. 
  • ज्योतिषशास्त्रानुसार नागदेवतेची पूजा केल्यास वास्तूदोष दूर होतीलच शिवाय कुंडलीतील कालसर्प दोष देखील समाप्त होऊ शकतात. 

(नक्की वाचा: Shravan 2025 Vrat Importance: श्रावणातील शिवपूजनाचे महत्त्व, नक्त व्रत आणि या 2 तिथीला अभिषेक करणे ठरेल फलदायी)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)