जाहिरात

Google Gemini Trend Risk: AI फोटोत कपड्याखाली झाकलेली गोष्ट कशी दिसली? महिलेचा सर्वांनाच घाबरवणारा अनुभव

Google Gemini Trend Risk: महिलेला मिळालेल्या एडिटेड फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ दिसला, जो तिच्या मूळ फोटोमध्ये पूर्ण बाह्यांच्या कपड्यांमुळे दिसत नव्हता.

Google Gemini Trend Risk: AI फोटोत कपड्याखाली झाकलेली गोष्ट कशी दिसली? महिलेचा सर्वांनाच घाबरवणारा अनुभव

Google Gemini Trend Risk: गुगल जेमिनीच्या Banana AI Saree Trend इंटरनेटवर धुमाकूळ घातला असतानाच एका महिलेने या तंत्रज्ञानासोबतचा तिचा ‘घाबरवणारा' अनुभव शेअर केला आहे. ज्यामुळे इंटरनेट जगतात खळबळ उडाली आहे. या महिलेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तिने सांगितले की तिने ट्रेंडनुसार आपली साडीतील एक फोटो जेमिनीवर अपलोड केला आणि त्यानंतर तिला मिळालेल्या AI फोटोमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.

महिलेला मिळालेल्या एडिटेड फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ दिसला, जो तिच्या मूळ फोटोमध्ये पूर्ण बाह्यांच्या कपड्यांमुळे दिसत नव्हता. मात्र फोटोत तीळ दिसत असल्याने महिला गोंधळून गेली. ‘जेमिनीला माझ्या शरीराच्या या भागावर तीळ आहे, हे कसे कळले? हे खूप भीतीदायक आणि घाबरवणारे आहे. असे कसे घडले, याची मला खात्री नाही,' अशी प्रतिक्रिया महिलेने दिली आहे. तिने लोकांना सोशल मीडियावर किंवा AI प्लॅटफॉर्मवर काहीही अपलोड करताना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

(नक्की वाचा-  Gemini Photo prompts For Men: मुलांसाठी 15 जबरदस्त प्रॉम्प्ट! कॉपी करा अन् तुमच्या फोटोला द्या स्टायलिश लूक)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओला आतापर्यंत 70 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी त्यांच्यासोबतही असेच अनुभव घडल्याचे सांगितले आहे. काही युजर्सनी म्हटले आहे की, ‘हेच AI चे काम आहे. AI तुमच्या ऑनलाइन अपलोड केलेल्या सर्व फोटोंमधून माहिती गोळा करते. तुम्ही जेव्हा AI ला इमेज तयार करण्यास सांगता, तेव्हा ते तुमच्या जुन्या अपलोड केलेल्या माहितीचाही वापर करते.' आणखी एका युजरने सांगितले की, ‘हे माझ्यासोबतही घडले. माझ्या शरीरावरचे टॅटू मूळ फोटोमध्ये दिसत नसतानाही ते AI ने दाखवले.'

काही तज्ज्ञांनी याला ‘डिजिटल फूटप्रिंट' असे म्हटले आहे, म्हणजे इंटरनेटवर तुम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती AI गोळा करते.

(नक्की वाचा- Gemini AI Photos Trend Safety: क्षणाचा आनंद, आयुष्यभर मनस्ताप! जेमिनी ट्रेंड वापरताना काय काळजी घ्यावी?)

नॅनो बनाना म्हणजे काय? (What is Nano Banana?)

‘नॅनो बनाना' हे गुगलच्या जेमिनी ॲपमधील एक इमेज-एडिटिंग एआय टूल आहे. सुरुवातीला हे टूल 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी लोकप्रिय झाले होते, पण आता त्याचा वापर साडीच्या ट्रेंडसारख्या इतर कामांसाठीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या घटनेने AI चा वापर करताना युजर्सनी आपली सुरक्षितता जपण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com