जाहिरात

Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत चुकूनही घालू नका 'हे' 3 रंगांचे कपडे, रीसर्चमधील धक्कादायक माहिती समोर

Nautapa 2026: यंदा 25 मे ते 2 जून दरम्यान नवतपाचा काळ असणार आहे. या 9 दिवसांच्या भीषण उष्णतेमध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावे आणि कोणते रंग टाळावे, याविषयी संशोधनातून समोर आलेली धक्कादायक माहिती सविस्तर वाचा.

Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत चुकूनही घालू नका 'हे' 3 रंगांचे कपडे, रीसर्चमधील धक्कादायक माहिती समोर
"Navtapa 2026: नवतपापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?"
Echion

Nautapa 2026: नवतपाचा कालावधी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी सुरू होतो. यंदा 25 मेपासून ते 2 जूनपर्यंत नवतपाचा काळ असणार आहे. नवतपाचे नऊ दिवस अतिशय उष्ण असतात, या दिवसांतील प्रचंड उष्णतेमध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. अनेकदा आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेतो, जसे की रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, सकस आहार घेणे आणि वेळेवर झोपणे; पण तुम्हाला माहीत आहे का की या 9 दिवसांत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी केवळ एवढेच करणे पुरेसे नाही?

Latest and Breaking News on NDTV

आता तुम्ही विचार करत असाल की असे काय करावे, ज्यामुळे या भीषण उष्णतेच्या तडाख्याचा आपल्याला फटका बसणार नाही. जाणून घेऊया सविस्तर माहिती...

खाण्यापिण्यासोबतच आणखी काय करावे लागेल?

तुम्हाला फक्त तुमच्या खाण्यापिण्याचीच काळजी घ्यायची नाही, तर तुम्ही काय परिधान करून बाहेर पडत आहात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे! नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात (रीसर्च) कडक उन्हामध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे वाळत घालण्यात आले आणि एका तासानंतर त्यांचे तापमान तपासले गेले. यामध्ये असे दिसून आले की निळा (Blue), हिरवा (Green) आणि काळा (Black) रंगाच्या कपड्यांचे तापमान 60 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त नोंदवले गेले. दुसरीकडे पांढरा (White), राखाडी (Grey) आणि पिवळा (Yellow) रंगाचे कपडे तुलनेने थंड होते.

त्यामुळे जर तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि सुरक्षित ठेवायचे असेल, तर येणाऱ्या 9 दिवसांत चुकूनही निळा, हिरवा, काळा रंगांचे कपडे घालून उन्हात बाहेर पडू नका.

(नक्की वाचा : Nautapa 2026: नवतपाच्या 9 दिवसांत 'या' एका भाजीपासून राहा लांब; नाहीतर आरोग्याबाबत पश्चाताप करावा लागेल!)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com