Hair Growth Tips: नाभीवर हे तेल लावून करा मसाज, केसांची होईल जबरदस्त वाढ

Navel Oil Therapy : नाभीवर तेल लावून मसाज केल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins

Hair Growth Tips : केस सुंदर, काळेभोर आणि लांबसडक व्हावेत, यासाठी लोक महागडे शॅम्पू - हेअरमास्क वापरतात. पण महागड्या शॅम्पू, सीरममुळे केसांवरील चमक दीर्घकाळ टिकून राहत नाही. या उलट केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुम्ही देखील केसांशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त आहात का? तर एक साधा पण रामबाण उपाय जाणून घेऊया...

रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावून मसाज केल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहते आणि केस चमकदारही दिसतात. केसांसाठी हा उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतो. नाभीवर कोणते तेल लावल्यास केसांना सर्वाधिक फायदे मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

नाभीवर कोणते तेल लावावे?

केसांची चांगली वाढ व्हावी, यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित नारळाचे तेल लावावे. नारळाच्या तेलामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊ शकतो. यामुळे केस काळेभोर आणि घनदाट देखील होतील. 

(नक्की वाचा: चेहऱ्यावर नारळाचे तेल लावावे की लावू नये? त्वचेवर तेल लावण्याची ही आहे योग्य पद्धत)

नारळाच्या तेलातील औषधी गुणधर्म 

- नारळाच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन ई यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास तसेच केसांवरील चमक टिकून राहण्यास मदत मिळते. 
- केसांमधील ओलावा टिकून राहतो. 
- कोरड्या केसांची समस्या कमी होते.
- केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते.
- केसगळती आणि केसांचे तुटणे कमी होते. 

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल)

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

- कांद्याचा रस वापरल्यासही केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळू शकते. हा उपाय देखील रामबाण आहे. 
- आवळा आणि मेथीच्या बिया देखील केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा, यातील पोषणतत्त्वांमुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. 
- मेथीच्या बियांमधील औषधी गुणधर्मामुळे केसांचे तुटणे, केसगळती कमी होते. 
- कोरफडीच्या गरामुळे चांगली वाढ होते. यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस मुळासह मजबूत होतात. 

(नक्की वाचा: Beauty Tips: केसांसाठी केमिकल ट्रिटमेंट करताय? नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांच्या टिप्स)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.