
Navratri 2025| Dussehra 2025 Date And Time: शारदीय नवरात्रौत्सव देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. दुर्गामातेच्या नऊ रुपांची भाविक मनोभावे पूजाअर्चना करतात. शैलपुत्री माता, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा माता, स्कंदमाता माता, कात्यायनी माता, कालरात्री माता, महागौरी माता, सिद्धिदात्री माता या दुर्गामातेच्या नऊ रुपांची नऊ दिवस पूजा केली जाते. नवरात्रौत्सवामधील अष्टमी तिथी, नवमी तिथी आणि दशमी तिथीस विशेष महत्त्व आहे. दुर्गाष्टमी, महानवमी आणि दशमी/दसरा सणाची तिथी, शुभ मुहूर्ताबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया….
30 सप्टेंबर 2025 अष्टमी तिथी मुहूर्त| Ashtami Navami Puja Time | Ashtami Tithi Start Time And Ashtami Tithi End Time
अष्टमी तिथी 29 सप्टेंबर संध्याकाळी 4.31 वाजेपासून ते 30 सप्टेंबर संध्याकाळी 06.06 वाजपर्यंत आहे.
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:47 वाजेपासून ते दुपारी 12:35 वाजेपर्यंत आहे.
- अमृत काल : 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:56 वाजेपासून ते 1 ऑक्टोबर रोजी 04:40 पहाटेपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त : दुपारी 02:10 वाजेपासून ते दुपारी 02:58 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:08 वाजेपासून ते संध्याकाळी 06:32 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त : 30 सप्टेंबर रोजी रात्री 11:47 वाजेपासून ते उत्तररात्री 12:35 (AM.1 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
- ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:37 वाजेपासून ते पहाटे 05:25 वाजेपर्यंत आहे.

Photo Credit: Canva
1 ऑक्टोबर 2025 नवमी तिथी मुहूर्त| Maha Navami Puja Time | Navami Tithi Start Time And Navami Tithi End Time
नवमी तिथीस 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06.06 वाजता सुरुवात होणार असून 1 ऑक्टोबर संध्याकाळी 7.01 वाजता तिथी समाप्त होईल.
- अभिजित मुहूर्त : नाही
- अमृत काळ : उत्तररात्री 02:31 (AM) वाजेपासून ते 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 04:12 वाजेपर्यंत आहे.
- रवि योग : सकाळी 08:06 वाजेपासून ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 06:15 वाजेपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त : दुपारी 02:09 वाजेपासून ते दुपारी 02:57 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:07 वाजेपासून ते संध्याकाळी 06:31 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त : सकाळी 11:46 वाजेपासून ते 2 ऑक्टोबर रोजी उत्तररात्री 12:35 (AM) वाजेपर्यंत आहे.
- ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:37 वाजेपासून ते 05:26 वाजेपर्यंत आहे.
(नक्की वाचा: Dussehra 2025: यंदा दसरा कधी आहे, 1 की 2 ऑक्टोबर? योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या)

Photo Credit: PTI
2 ऑक्टोबर 2025 : दसरा/ विजयादशमी | Dussehra Puja Time | Dussehra Tithi Start Time And Dussehra Tithi End Time
दशमी तिथी 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.01 वाजेपासून ते 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजेपर्यंत आहे.
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:46 वाजेपासून ते दुपारी 12:34 वाजेपर्यंत आहे.
- अमृत काल : 2 ऑक्टोबर रात्री 11:01 वाजेपासून ते उत्तररात्री 12:38 (AM,3 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
- रवि योग : अहोरात्रि
- विजय मुहूर्त : दुपारी 02:09 वाजेपासून ते दुपारी 02:56 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:06 वाजेपासून ते संध्याकाळी 06:30 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त : रात्री 11:46 वाजेपासून ते उत्तररात्री 12:35 (AM,3 ऑक्टोबर ) वाजेपर्यंत आहे.
- ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:38 वाजेपासून ते पहाटे 05:26 वाजेपर्यंत आहे.

Photo Credit: PTI
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world