
Navratri Shopping Best 5 Market In Mumbai: नवरात्रीचा (Navratri 2025) सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. मुंबईमध्ये नवरात्रीचा वेगळाच जल्लोष आणि माहोल पाहायला मिळतो. नवरात्रीमध्ये मुंबईनगरी दांडियाच्या शोज गजबजलेली असते. त्यामुळे नवरात्रीत प्रत्येकालाच खास, सुंदर अन् हटके लूक हवा असतो. या खास लूकसाठी मुंबईकरांची खरेदीची लगबग सुरु आहे. तुम्हीही नवरात्रीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणार असाल तर तुम्हाला स्वस्तात मस्त शॉपिंग होईल अशी ठिकाणे, मार्केट माहित असायलाच हवीत. मुंबईमध्ये कोणती आहेत अशी शॉपिंगची ठिकाणे? वाचा.... (Navratri Shopping Mumbai)

नवरात्री शॉपिंगसाठी मुंबईमधील 5 सर्वोत्तम मार्केट| TOP Mumbai Market For Navratri Shopping
१. मालाड मार्केट:|Malad Market
हे मार्केट नवरात्रीच्या खरेदीसाठी खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्हाला घागरा-चोली, चनिया चोली आणि इतर पारंपारिक कपडे कमी दरात मिळतात. काही ठिकाणी फक्त रु. ३५० पासून दुपट्टा सेट, रु. ५५० पासून डिझायनर चनिया चोली आणि रु. ७५० पासून घागरा-चोली मिळू शकतात.
२. बोरीवली मार्केट (जाम्भळी गल्ली)| Borivali Market, Jambhali Galli
बोरीवलीमधील जांभळी गल्ली ही नवरात्रीच्या शॉपिंगसाठी एक उत्तम जागा आहे. येथे तुम्ही कमी किमतीत चांगल्या दर्जाचे कपडे आणि दागिने खरेदी करू शकता. रस्त्याच्या कडेला अनेक दुकाने आणि स्टॉल्स आहेत, जिथे तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध आहेत.
३. भुलेश्वर मार्केट:|Bhuleshwar Market
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर मार्केट हे नवरात्रीच्या खरेदीसाठी एक स्वस्त आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे पारंपरिक आरशांच्या कामाचे कपडे, ऑक्सिडाइज्ड दागिने आणि पूजेचे साहित्य मिळते. तुम्ही येथे कमी किमतीत लेहेंगा खरेदी करू शकता, अगदी अर्ध-शिवलेले लेहेंगा देखील येथे उपलब्ध आहेत.
४. लिंकिंग रोड आणि हिल रोड, वांद्रे| Linking Road And Hill Road Bandra
वांद्रे येथील लिंकिंग रोड आणि हिल रोड हे मार्केट फॅशन आणि ट्रेंडी कपड्यांसाठी ओळखले जातात. येथे तुम्हाला अनेक मोठ्या ब्रँड्सच्या कॉपी खूप कमी किमतीत मिळतील. कपड्यांपासून ते फुटवेअर आणि दागिन्यांपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे.
५. कोलाबा कॉजवे, दक्षिण मुंबई: Colaba Causeway, South Mumbai
दक्षिण मुंबईमधील कोलाबा कॉजवे हे मार्केट मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारचे कपडे, दागिने आणि इतर गोष्टी स्वस्त दरात मिळतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world