Negative Impact of Wallpapers : आजच्या घडीला मोबाईल फोन अनेकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे.काही लोक खूप वेळ मोबाईलची स्क्रीन पाहतात.त्यामुळे मोबाईलवर लावलेले वॉलपेपरही आपला विचार,भावना आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतो.अनेक लोक त्यांच्या आवडीचे फोटो आणि आकर्षक इमेजेस लावतात.पण काही प्रकारचे वॉलपेपर नकारात्मक भावना,तणाव आणि जुन्या आठवणींना सतत ताज्या करू शकतात.
एज्युकेशनिस्ट निती कौशिक यांच्या माहितीनुसार,फोनचा वॉलपेपर फक्त स्क्रीनची सजावट नाही,तर आपले मन आणि एनर्जीवरही नकारात्मक परिणाम करू शकतो. अशातच त्यांनी चार वॉलपेपर्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.ज्यामुळे तुमची मानसिक शांती,फोकस आणि सकारात्मकतेला प्रभावीत करू शकतं.जाणून घेऊयात हे वॉलपेपर कोणते आहेत आणि त्यांना मोबाईलवर का ठेऊ नये..
आज मोबाईल फक्त संवाद साधण्यासाठी किंवा सोशल मीडियापर्यंतच लिमिटेड नाही. मोबाईल फोनचा परिणाम आपले विचार आणि लाईफस्टाईलवरही पडतो. लोक नेहमी त्यांच्या मोबाईलमची स्क्रीन सजवण्यासाठी वेगवेगळे वॉलपेपर लावतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, याचा तुमच्या जीवनावरही परिणाम होऊ शकतो.
नक्की वाचा >> Neet Exam Result : नीट फेरपरीक्षेचा पुण्यातील विद्यार्थ्याला फटका, रँकमध्ये मोठी घसरण, पालक कोर्टात जाणार
डार्क,निराशाजनक किंवा भीतीदायक वॉलपेपर
तुमच्या फोनमध्ये कधीही डार्क,निराशाजनक किंवा भीती दर्शवणारा वॉलपेपर कधीही लावू नका. काळ्या, गडद रंग किंवा हॉरर थीमचे वॉलपेपर तुमच्या मेंदूत नकारात्मक हार्मोन्सला वाढवतात.यामुळे थकवा,चिंता आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.
तुटलेल्या नात्याचे वॉलपेपर
तुटलेलं नातं,नैराश्य किंवा ब्रोकन हॉर्ट म्हणजेच तुटलेल्या नात्यांचा वॉलपेपर तुमच्या फोन किंवा डेस्कटॉपवर कधीच लावू नये.आपण जे पुन्हा पुन्हा पाहतो,आपली बुद्धी आणि मन त्याचप्रकारचे विचार आणि एनर्जी क्रिएट करतात.जेव्हा तुम्ही सतत नैराश्याच्या किंवा तुटलेल्या नात्यांचे फोटो पाहता,त्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील, राजकीय वर्तुळात खळबळ
खूप जास्त कलर किंवा टेक्स्टवाले वॉलपेपर
मोबाईल स्क्रीन किंवा डेस्कटॉपवर खूप जास्त रंग किंवा टेक्स्टवाले वॉलपेपर लावले नाही पाहिजेत. ते तुमच्या डोळ्यांवरील ताण वाढवतात.तसच बॅटरीही संपते आणि स्क्रीनवर अॅप्सला शोधणं कठीण होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world