जाहिरात

New Earning Idea: जुने कपडे विका अन् पैसे कमवा; नेमकं करायचं काय? जाणून घ्या

Earning Idea By Selling Clothes: जुने कपडे खरेदी करतात. या वेबसाईट्सवर तुमचे कपडे विकून तुम्हीही मालामाल होऊ शकता. कशी कराल कमाई अन् कोणते आहेत त्या वेबसाईट्स? जाणून घ्या

New Earning Idea: जुने कपडे विका अन् पैसे कमवा; नेमकं करायचं काय? जाणून घ्या

Earning Idea By Selling Clothes: आपल्या कपाटात अशी अनेक कपडे असतात ज्यांना आपण एकदा किंवा दोनदा घातलेले असतात. हे कपडे कपाटात गर्दी करत असतात किंवा घरात इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. अनेकदा आपण असे कपडे फेकूनही देतो. पण तुम्हाला माहित आहे का? याच जुन्या कपड्यांना विकून तुम्ही चांगली कमाई करु शकता. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहे. ज्या जुने कपडे खरेदी करतात. या वेबसाईट्सवर तुमचे कपडे विकून तुम्हीही मालामाल होऊ शकता. कशी कराल कमाई अन् कोणते आहेत त्या वेबसाईट्स? जाणून घ्या सविस्तर...

Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

FreeUP:
जर तुमच्याकडे काही नवीन किंवा ब्रँडेड कपडे असतील जे फक्त एकदाच घातलेले असतील, तर FreeUP तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. हे अॅप विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांचे नको असलेले कपडे लवकर विकायचे आहेत. FreeUP अॅप वापरण्यास खूप सोपे आहे. तुम्हाला तुमच्या कपड्यांचा फोटो काढावा लागेल आणि तो प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करावा लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे कपडे खरेदी करते तेव्हा तुम्हाला ते पॅक करावे लागेल आणि नंतर कंपनीचा माणूस स्वतः तुमच्या घरातून ते कापड घेईन जाईल.

Etashee.com: थेट विक्रीसाठी उत्तम पर्याय

Etashee.com ही एक वेबसाइट आहे जी तुम्हाला तुमचे कपडे थेट विकण्याचा पर्याय देते. येथे तुम्ही तुमचे जुने कपडे कंपनीने मंजूर केलेल्या फॉर्मद्वारे सूचीबद्ध करता. लोक Etashee वर त्यांचे कपडे सहजपणे विकू शकतात आणि कंपनीने विक्रेत्यांना मदत करण्यासाठी काही खास विक्री टिप्स देखील दिल्या आहेत, ज्यांचे अनुसरण करून तुम्ही चांगले विकू शकता.

Ayurevada Tips: चपातीला तूप लावून खाणे योग्य का अयोग्य? आयुर्वेदात दडलंय उत्तर

GLETOT:
जर तुम्हाला पूर्णपणे सोपी प्रक्रिया हवी असेल, तर GLETOT तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हे प्लॅटफॉर्म जुने कपडे विकण्यास मदत करण्यासाठी सर्वोत्तम सेवा देते. GLETOT अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे जुने कपडे कोणत्याही अडचणीशिवाय विकू शकता. फक्त अ‍ॅप डाउनलोड करा, तुमचे खाते तयार करा आणि कपड्यांची यादी करा. विशेष म्हणजे तुम्हाला डिलिव्हरीची काळजी करण्याची गरज नाही, कारण कंपनी स्वतः तुमच्या घरातून कपडे घेऊन जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com