जाहिरात

Cardiac Arrest Symptoms: Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Heart Attack Symptom's And Precautions Expert Advice: कोणते संकेत गांभीर्याने घ्यावेत, तात्काळ डॉक्टरांची मदत कधी घ्यावी? याबाबतच पद्मभूषण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. टीएस क्लेअर यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 

Cardiac Arrest Symptoms: Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

Shefali Jariwala Death Heart Attack Symptoms' And Precautions: बॉलिवूडची काटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूने संपूर्ण सिनेविश्व हादरुन गेले आहे. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी शेफालीने जगाचा निरोप घेतला. हार्ट अटॅकमुळे या हरहुन्नरी अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याचं आत्तापर्यंतच्या अहवालातून समोर आलं आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा हार्ट अटॅकच्या वाढत्या धोक्याने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीर आपल्याला काही संकेत देते. हे संकेत ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास रुग्णांचा जीव वाचू शकतो. शरीराने दिलेले कोणते संकेत गांभीर्याने घ्यावेत, तात्काळ डॉक्टरांची मदत कधी घ्यावी? याबाबतच पद्मभूषण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. टीएस क्लेअर यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 

हार्ट अटॅकपूर्वी शरीराकडून मिळणारे संकेत! (Symptoms Of Heart Attack)

छातीत दुखणे: हृदयविकाराच्या झटक्याचे सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे. ही वेदना छातीत, छातीच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला आणि जबड्यात जाणवू शकते. कधीकधी ही वेदना तीव्र असते परंतु अनेक प्रकरणांमध्ये ही वेदना खूप सौम्य ते मध्यम असू शकते. ही वेदना काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते. (जर तुम्हाला छातीत दुखत असेल, हात किंवा जबड्यात वेदना होत असतील किंवा वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.)

श्वास घेण्यास त्रास: काही लोकांना हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी कमी वेदना होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. विशेषतः मधुमेही रुग्णांना वेदना होत नाहीत. त्यांच्या नसा ओल्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत.

बेशुद्ध होणे:  बेशुद्ध होणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. काही प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यास त्रास होणे आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता यामुळे रुग्ण बेशुद्ध होतो. डोकं गरगरणं किंवा भोवळ येण्यासारखं वाटणं हे सुद्धा हार्ट अटॅकचे लक्षण आहे. 

हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? (Precautions Of Avoid Heart Attack)

नियमित तपासणी: वय ४० नंतर नियमित रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची तपासणी करा. हृदयविकाराचा धोका वेळीच ओळखता येतो.

संतुलित आहार: तेलकट, तळलेले पदार्थ टाळा. हिरव्या पालेभाज्या, फळं, आणि धान्यांचा आहारात समावेश करा. मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी ठेवा.

व्यायाम: रोज किमान ३० मिनिटं चालणं, योग किंवा हलका व्यायाम करा. यामुळे हृदय निरोगी राहतं.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा: धूम्रपान आणि जास्त मद्यपान हृदयाला हानी पोहोचवतं. यापासून पूर्णपणे लांब रहा.

तणाव व्यवस्थापन: ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप यामुळे तणाव कमी होतो. तणाव हृदयविकाराचा मोठा शत्रू आहे.

प्रथमोपचार जाणून घ्या: हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी CPR (Cardiopulmonary Resuscitation) कसं द्यायचं हे शिका. यामुळे जीव वाचवता येऊ शकतो.


Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com