Toll Naka: राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल प्लाजावर टोल देणे अनिवार्य आहे. अनेकदा हायवेच्या आसपास किंवा टोल प्लाजाच्या जवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये असा एक मोठा समज असतो की, फक्त आपले आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणतेही स्थानिक ओळखपत्र (ID Card) दाखवून त्यांना टोलमधून पूर्णपणे सूट मिळू शकते.
परंतु, हा केवळ एक सोशल मीडियावरील गैरसमज असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (NHAI) स्पष्ट केले आहे. NHAI ने आपल्या अधिकृत 'X' हँडलवरून पोस्ट करत या नियमामागचे नेमके सत्य काय आहे, हे देशवासीयांना सांगितले आहे.
केवळ आयडी कार्ड दाखवून मोफत प्रवास नाही
NHAI ने स्पष्ट केले आहे की, टोल प्लाजाच्या जवळ राहणाऱ्या सर्वच स्थानिक लोकांना केवळ ओळखपत्र दाखवून मोफत जाण्याची कोणतीही कायदेशीर सुविधा उपलब्ध नाही.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेलकाय आहेत अधिकृत नियम?