Toll Naka: राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल प्लाजावर टोल देणे अनिवार्य आहे. अनेकदा हायवेच्या आसपास किंवा टोल प्लाजाच्या जवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये असा एक मोठा समज असतो की, फक्त आपले आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणतेही स्थानिक ओळखपत्र (ID Card) दाखवून त्यांना टोलमधून पूर्णपणे सूट मिळू शकते.
परंतु, हा केवळ एक सोशल मीडियावरील गैरसमज असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (NHAI) स्पष्ट केले आहे. NHAI ने आपल्या अधिकृत 'X' हँडलवरून पोस्ट करत या नियमामागचे नेमके सत्य काय आहे, हे देशवासीयांना सांगितले आहे.
केवळ आयडी कार्ड दाखवून मोफत प्रवास नाही
NHAI ने स्पष्ट केले आहे की, टोल प्लाजाच्या जवळ राहणाऱ्या सर्वच स्थानिक लोकांना केवळ ओळखपत्र दाखवून मोफत जाण्याची कोणतीही कायदेशीर सुविधा उपलब्ध नाही.
🚧 Know Your National Highways | #MythvsFact
— NHAI (@NHAI_Official) June 12, 2026
Today's myth addresses a common misconception that all local residents living near a toll plaza can travel toll-free simply by showing their identity cards.
In reality, there is no provision for free travel for local residents. As… pic.twitter.com/sqxOgjiYXa
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
काय आहेत अधिकृत नियम?
- लोकल मंथली पास : नियमानुसार, जे स्थानिक नागरिक टोल प्लाजाच्या जवळ राहतात आणि सवलतीसाठी पात्र आहेत, त्यांना कायदेशीर अटी व शर्तींच्या अधीन राहून एक 'लोकल मंथली पास' बनवावा लागतो. हा पास दाखवल्यानंतरच त्यांना टोलच्या दरांमध्ये सवलत मिळते.
- 20 किलोमीटरची मर्यादा: सामान्यतः ही सवलत किंवा मंथली पास मिळण्याची सुविधा टोल प्लाजापासून साधारणपणे 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांसाठीच लागू असते.
- प्रत्येक टोलचे वेगवेगळे नियम: प्रत्येक राष्ट्रीय महामार्ग आणि टोल प्लाजाच्या भौगोलिक आणि प्रशासकीय रचनेनुसार या नियमांमध्ये थोडेफार बदल असू शकतात. त्यामुळे केवळ आयडी दाखवून मोफत प्रवासाचा हट्ट धरणे चुकीचे आहे.