No Shave November 2025: नोव्हेंबर महिना सुरू झाला की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरु होतो. तो म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर'. ट्विटर असो, इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक, सगळीकडे पुरुष मंडळी लांब केस, वाढलेल्या दाढी-मिशांमध्ये आपले फोटो (#NoShaveNovember) शेअर करताना दिसतात. अनेकांसाठी ही केवळ एक फॅशन किंवा आळशीपणातून मिळालेली सूट असते, पण या 'नो शेव्ह' करण्यामागे एक खास कारण आहे.
'नो शेव नोव्हेंबर' म्हणजे नेमकं काय?
नोव्हेंबर महिन्यात पुरुष दाढी (शेव्हिंग) करत नाहीत, तसेच केस कापत नाहीत. हा ट्रेंड केवळ दाढी न करण्यापुरता मर्यादित नाही. कटिंग, वैक्सिंग, थ्रेडिंग यांसारखे शरीराचे केस काढण्याचे सर्व प्रयत्न या 30 दिवसांसाठी थांबवले जातात. विशेष म्हणजे, हा ट्रेंड फक्त एका शहरात किंवा देशात नाही, तर जगभर मोठ्या उत्साहाने पाळला जातो. पण, या ट्रेंडमागे लपलेला मूळ उद्देश अनेक लोकांना माहीत नसतो.
का सुुरु झाला उपक्रम?
नो शेव्ह नोव्हेंबर साजरा करण्यामागे असलेले मुख्य कारण म्हणजे कॅन्सर, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer) बाबत जनजागृती करणे. या अभियानाला पाठिंबा देणारे पुरुष नोव्हेंबर महिन्यात दाढी किंवा केस कापणे बंद करतात. केस आणि दाढीची काळजी घेण्यासाठी (Maintenance) जो पैसा खर्च होतो, तो खर्च या मोहिमेला दान केला जातो. कॅन्सर प्रतिबंध, उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना या पैशांची मदत होते.
( नक्की वाचा : Love Story: 53 VS 23! ज्या काकांच्या मांडीवर खेळली... मोठी झाल्यावर त्याच अंकलसोबत तरुणीनं केले लग्न )
'नो शेव्ह नोव्हेंबर' ची सुरुवात कधी झाली
या अभियानाची सुरुवात 2009 साली एका अमेरिकन स्वयंसेवी संस्थेद्वारे (Non-Profit Organization), 'मॅथ्यू हिल फाउंडेशन' ने केली होती. या संस्थेच्या स्थापनेमागे एक दुःखद कहाणी आहे.
2007 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात राहणाऱ्या मॅथ्यू हिल यांचे कॅन्सरशी लढताना निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या आठ मुलांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्याप्रमाणेच कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इतरांना मदत करण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. यातूनच 'नो शेव्ह नोव्हेंबर' या मोहिमची सुरुवात झाली.
सुरुवातीच्या 2 वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम जगभर पोहोचवण्याचे प्रयत्न झाले आणि हळूहळू याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज अनेकजण कारण पूर्णपणे माहीत नसतानाही हा ट्रेंड साजरा करतात.
नो शेव्ह नोव्हेंबर आणि 'मोव्हेंबर' (Movember) मधील फरक
नो शेव्ह नोव्हेंबर प्रमाणेच, 'मोव्हेंबर' नावाचा एक आणखी एक जनजागृती अभियान आहे. ‘मोव्हेंबर' हे दोन शब्दांनी मिळून बनले आहे: 'मुश्टैश' (Moustache-मिशी) आणि 'नोव्हेंबर'.
नो शेव्ह नोव्हेंबर: याचा मुख्य उद्देश केवळ कॅन्सर जनजागृती आणि मदतीसाठी निधी गोळा करणे आहे.
मोव्हेंबर: हे अभियान 2004 साली सुरू झाले असून, याचा उद्देश पुरुषांना त्यांच्या आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल (Health and Lifestyle) जागरूक करणे आहे. या अभियानाचे समर्थन करणारे पुरुष नोव्हेंबर महिन्यात फक्त मिशा (Moustache) वाढवून त्याला आपला पाठिंबा देतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world