 
                                            Shocking Viral Love Story: प्रेम आंधळे असते आणि त्याला वयाचे बंधन नसते, हे एका अविश्वसनीय लव्ह स्टोरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या 'रिअल-लाइफ लव्ह इज ब्लाइंड' (Real-Life Love is Blind) गोष्टीमध्ये, 53 वर्षीय व्यक्तीने आपल्या जुन्या मैत्रिणीच्या 23 वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे. तब्बल 30 वर्षांचे मोठे अंतर असलेली ही जोडी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काका म्हणत मांडीवर खेळली...
ही अनोखी कहाणी जपानमधील कागावा ( Japan, Kagawa) प्रांतातील आहे. मिझुकी (Mizuki) नावाचे 53 वर्षीय गृहस्थ त्यांच्या जुन्या मैत्रिणीच्या घरी नेहमी येत-जात असत. त्यांची मुलगी मेगुमी (Megumi) त्यावेळी अवघ्या 5 वर्षांची होती आणि ती मिझुकी यांच्या मांडीवर खेळायची. अनेक वर्षांनंतर हीच मुलगी त्यांच्या आयुष्याची जोडीदार होईल, याची कल्पना तेव्हा कोणीच केली नव्हती.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या (South China Morning Post) रिपोर्टनुसार, 2022 मध्ये जेव्हा मेगुमीने आपल्या आईच्या दुकानात मदत करायला सुरुवात केली, तेव्हा मिझुकी आणि तिची भेट पुन्हा वाढली. एकदा तिघांनी एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखला, पण मेगुमीची आई झोपी गेली आणि अशा प्रकारे दोघांची पहिली डेट झाली.
( नक्की वाचा : Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण )
 
पहिली डेट आणि प्रेमाची कबुली
चित्रपटाच्या नंतर दोघे रात्रीच्या जेवणासाठी (Dinner) गेले. या भेटीत मिझुकी यांच्या साधेपणाने मेगुमीचे मन जिंकले. यानंतर मेगुमी दर आठवड्याला कोणत्याही ना कोणत्याही बहाण्याने त्यांना भेटायला बोलावू लागली. सुरुवातीला मेगुमीला हे केवळ आदर आणि सलोख्याचे नाते वाटले. मात्र, जेव्हा तिने मिझुकी यांना दुसऱ्या महिलेसोबत बोलताना पाहिले, तेव्हा तिला त्यांच्यावरील प्रेमाची जाणीव झाली.
मेगुमीने धीर एकवटून मिझुकी यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला (Dating) सुरुवात केली.
आईचा विरोध, पण प्रेमाची जीत
या नात्यात सर्वात मोठा अडथळा होता, तो म्हणजे मेगुमीची आई. जुन्या मित्राला 30 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत डेट करताना पाहून मेगुमीच्या आईचा या नात्याला विरोध होता. मात्र, प्रेम आपले मार्ग शोधतेच.
डेटिंगला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिझुकी यांनी मेगुमीला लग्नासाठी प्रपोज केले आणि दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज (Court Marriage) केले.
( नक्की वाचा : 8th Pay Commission: लॉटरी लागली! 'फिटमेंट फॅक्टर'नुसार पगार दुप्पट होणार? तुमचं वेतन किती वाढेल? इथं करा चेक )
 
भावनिक पत्राने सासूबाईंचे मन जिंकले
लग्नानंतर एका टीव्ही शोदरम्यान मिझुकी यांनी मेगुमीच्या आईसमोर (म्हणजेच त्यांच्या जुन्या मैत्रिणीसमोर) एक भावनिक पत्र वाचले. हे पत्र इतके हृदयस्पर्शी होते की, मिझुकी यांच्या सासूबाईंचे मन पिघळले. अखेरीस, त्यांनी या दोघांना आशीर्वाद दिला. 30 वर्षांच्या अंतरामुळे चर्चेत असलेली ही जोडी आज आनंदी आहे.
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
