Numerologyनुसार या तारखेला जन्मलेले लोक असतात शांत, Devendra Fadnavis यांचाही हाच आहे मुल्यांक    

Numerology Tips : 4, 13, 22 आणि 31 या तारखेला जन्मलेल्या लोकांचे वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुल्यांक 4 असतो. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Numerology 2024 : हिंदू धर्मानुसार व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार त्यांचे गुणदोष आणि स्वभावाची माहिती कळते. याच आधारे जन्मकुंडलीही तयार केली जाते. अंकशास्त्रामध्येही तारखेचे खास महत्त्व आहे. या लेखाद्वारे आपण 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुल्यांक 4 असतो. 22 जुलै 1970 ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जन्मतारीख आहे. त्यामुळे फडणवीस यांचाही मुल्यांक 4 आहे. तर या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

4 मुल्यांक असणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते? What Is The Personality Of People With Number 4 In Marathi

  • 4 मुल्यांक असणाऱ्यांचा स्वामी राहु ग्रह असतो. 
  • ही मंडळी जीवनामध्ये प्रचंड प्रगती करतात. 
  • स्वभावाने अतिशय समजूतदार आणि चाणाक्ष असतात. 
  • ही मंडळी लोकांशी लगेच मैत्री करतात.
  • कोणाच्याही दबावाखाली राहणे त्यांना पसंत नसते. 

(नक्की वाचा: फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...)

  • 4 मुल्यांक असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य अतिशय प्रिय असते. मनमोकळेपणाने जगणे त्यांना आवडते. 

  • स्वभाव हट्टी असतो, पण शांत आणि प्रेमळही असतात.  
  • या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो, त्यानंतरच जीवनात यश मिळते. 
  • 4 मुल्यांक असणाऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असते.
  • त्यांना भौतिक सुख-सुविधा प्रचंड आवडतात. 
  • स्वभावाने ही मंडळी मायाळू असतात.
  • 4 मुल्यांक असणाऱ्यांना लगेच राग येत नाही. कोणत्याही समस्या अतिशय शांतीपूर्ण मार्गाने सोडवण्याचे ते प्रयत्न करतात. 

(नक्की वाचा: देवेंद्र फडणवीस 5 तारखेलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ का घेणार? ज्योतिषांनी सांगितलं महत्त्व)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV या माहिती पुष्टी करत नाही.)