- धकाधकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे
- कांद्यामध्ये असलेले सल्फर टाळूवरील रक्ताभिसरण सुधारून केसांच्या मुळांना बळकटी देण्यास मदत करते
- कांद्याचा रस अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे टाळूवरील सूज आणि इन्फेक्शन कमी करून केसांची वाढ करतो.
धकाधकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी 'कांद्याचा रस' हा एक प्रभावी घरगुती उपाय म्हणून समोर येत आहे. कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले सल्फर टाळूवरील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना (Hair Follicles) बळकटी मिळते. हा कोणताही चमत्कार नसला तरी, नियमित वापरामुळे केस दाट आणि मजबूत होतात.
कांद्याच्या रसाचे अनेक फायदे आहेत. कांद्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळूवरील इन्फेक्शन आणि सूज कमी करतात. अनेक जण कांद्याचा रस नारळ तेल, मध, सफरचंद व्हिनेगर किंवा कोरफड जेलसोबत मिसळून लावतात. यामुळे केसांची वाढ होण्यास आणि सल्फरची कमतरता भरून काढण्यास मदत होते. हा रस केसांची वाढ करण्यास मदत करतो. या आधी ही हे अनेक उदाहरणावरून दिसून आले आहे.
वापरण्याची पद्धत आणि दुर्गंधी कशी घालवावी? हे ही आपण पाहणार आहे. कांद्याचा उग्र वास घालवण्यासाठी त्यात लॅव्हेंडर किंवा रोझमेरी सारखे 'एसेंशियल ऑईल' टाकावे. मिश्रण टाळूवर लावून 30 मिनिटे ठेवावे आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवावे. केस धुताना पाण्यात लिंबाचा रस किंवा सफरचंद व्हिनेगर मिसळल्यास कांद्याचा वास पूर्णपणे निघून जातो. लक्षात ठेवा, जिथे केसांची मुळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तिथे कांद्याचा रस केस पुन्हा उगवू शकत नाही, परंतु केस विरळ होत असल्यास हा उत्तम उपाय आहे.
वापरण्याची सोपी पद्धत
- 1 ते 2 लाल कांदे किसून त्याचा रस कापडाने गाळून घ्या.
- हा रस केसांच्या मुळांना लावून 1 ते 2 तास राहू द्या.
- त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून केस शॅम्पूने धुवावे.
- संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी हा रस जास्त वेळ लावून ठेवू नये.
महत्त्वाची टीप सर्वांनीच लक्षात घ्या. कांद्याचा रस हा केसांच्या वाढीस मदत करतो, परंतु जिथे केसांची मुळे पूर्णपणे नष्ट झाली आहेत तिथे तो जादू करू शकत नाही. नियमितता आणि योग्य मिश्रणाचा वापर केल्यास केसांचा दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होते. केस धुल्यानंतर कंडिशनिंग करणे विसरू नका जेणेकरून केसांचा ओलावा टिकून राहील. हा प्रयोग करताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
नक्की वाचा - Weight Loss: वयाची 30 शी ओलांडल्यानंतर पोट का सुटते? त्या मागचे कारण ऐकून हैराण व्हाल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world