
OYO Hotels Free Stay Offer: जर तुम्ही फिरण्याचा किंवा फॅमिलीसोबत सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात आनंदाची बातमी आहे. ओयो हॉटेल्सने त्यांच्या ग्राहकांसाठी एका जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तुम्ही एकही रुपया खर्च न करता मोफत ओयोची रुम्स बुक करु शकता आणि राहू शकता. काय आहे ही ऑफर? वाचा अन् आत्ताच रुम बुक करा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे ओयोची खास ऑफर?
जगातील प्रसिद्ध हॉटेल्स रुमची सेवा पुरवणाऱ्या ओयो कंपनीने ग्राहकांसाठी मोफत रुम देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर देशभरातील 10000 हॉटेल्समध्ये उपलब्ध आहे. याअंतर्गत, कोणीही कधीही खोली बुक करू शकतो आणि मोफत राहू शकतो. प्रीमियम, बजेट, टाउनहाऊस - ही ऑफर जवळजवळ सर्व रूम श्रेणींसाठी लागू आहे. ही ऑफर देशभरातील 1000 हून अधिक हॉटेल्समध्ये लागू आहे, ज्यामध्ये प्रीमियम, बजेट, कलेक्शन-ओ आणि टाउनहाऊस सारख्या सर्व श्रेणीतील हॉटेल्सचा समावेश आहे.
रितेश अग्रवाल यांचे ट्वीट..
ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर या खास ऑफरबद्दल माहिती देणारी पोस्ट केली. " हा वीकेंड खास बनवण्यासाठी हाच योग्य वेळ आहे, त्यामुळे लोकांनी त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत एक अद्भुत अनुभव घ्यावा आणि संस्मरणीय क्षण जपावेत," असं ते म्हणालेत.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
तसेच या होळीला, मित्रांसोबत मजा करा, रंगांची उधळण करा, कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवा - जीवन हे मौजमजा आणि उत्सवासाठी आहे! असे रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही ऑफऱ 18 मार्चपर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ऑफर कशी मिळवाल?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना OYO च्या अधिकृत वेबसाइट किंवा OYO अॅपला भेट देऊन बुकिंग करावे लागेल. बुकिंग करताना विशेष कूपन कोड CHAMPIONS वापरणे आवश्यक आहे. तथापि, ऑफर 13 ते 18 मार्च दरम्यान दररोज फक्त पहिल्या 2000 ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे लवकर बुकिंग करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. जर तुम्हालाही आलिशान हॉटेलमध्ये मोफत राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर लगेच बुकिंग करा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world