Fatty Liver: सावधान! जे तुम्ही हेल्थ ड्रिंक समजून पिताय तोच ज्युस लिव्हर खराब करतोय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Fatty Liver: बाजारात मिळणारे 100 टक्के फ्रेश पॅक्ड फ्रुट ज्युस खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर असतात का? फॅटी लिव्हरचा धोका कसा वाढतो आणि लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Fatty Liver: फ्रेश ज्युसमुळेही लिव्हरचं होतंय नुकसान"
Canva

Fatty Liver: अनेकदा आपण ऐकतो की जास्त गोड, तळलेले पदार्थ, जंक फूड, मैदा आणि अल्कोहोलमुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की बाजारात मिळणारा पाकिटबंद फळांचा ज्युस देखील तितकाच हानिकारक ठरू शकतो? तज्ज्ञांच्या मते, '100 टक्के फ्रेश' (100% Fresh) लिहिलेल्या अनेक पॅक्ड ज्युसमध्ये 'लिक्विड फ्रुक्टोज' आढळते, जे फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकते.

या ज्युसमध्ये थोड्या प्रमाणात नैसर्गिक फळांचा अर्क असला तरी यातील लिक्विड फ्रुक्टोज लिव्हरमध्ये फॅट्स जमा होण्याचे कारण बनू शकते. 'क्लिनिकल न्युट्रिशन ओपन सायन्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार, पॅक्ड ज्युस जास्त प्रमाणात प्यायल्यास फॅटी लिव्हर आजाराचा (यकृतामध्ये चरबी जमा होणे) धोका वाढू शकतो.

Advertisement

लिक्विड फ्रुक्टोज कसे नुकसान पोहोचवते?

'अ‍ॅडव्हान्सेस इन न्युट्रिशन' जर्नलमधील माहितीनुसार, दीर्घकाळापर्यंत लिक्विड फ्रुक्टोजचे सेवन केल्याने लिव्हरवर जास्त ताण पडू शकतो. हे शरीरात वेगाने शोषले जाते, ज्यामुळे लिव्हर याचे रूपांतर फॅट्समध्ये करू लागते. याचा परिणाम लिव्हरच्या कार्यक्षमतेवर होतो आणि हळूहळू फॅट्स जमा होऊ लागते, ज्यामुळे 'इन्सुलिन रेझिस्टन्स'ची समस्या देखील उद्भवू शकते.

(नक्की वाचा : गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा)

फ्रुक्टोज किती प्रकारचे असते?

फ्रुक्टोज दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे जे नैसर्गिक स्वरूपात फळांमध्ये आणि अन्नपदार्थांमध्ये आढळते, दुसरे म्हणजे 'हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप' जे प्रामुख्याने पॅक्ड आणि प्रोसेस्ड फुडमध्ये (प्रक्रिया केलेल्या अन्नात) आढळते.

(नक्की वाचा : Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अ‍ॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)

डॉक्टरांचे मत काय आहे?

फोर्टिस मुलुंडच्या सीनियर गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर नूतन देसाई यांचे म्हणणे आहे की, लिक्विड फ्रुक्टोज शरीराच्या सामान्य मेटाबॉलिक (चयापचय) प्रक्रियेला बायपास करून थेट लिव्हरवर ताण निर्माण करते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सोप्या टिप्स

  • ज्युस पिण्याऐवजी संपूर्ण फळ चावून खा.
  • पॅक्ड ड्रिंक्स (पॅकबंद पेये) पिणे टाळा.
  • खरेदी करताना लेबलवर साखरेचे (शुगर) प्रमाण नक्की तपासा.
  • गोड पेयांचे सेवन कमी करा.
  • संतुलित आणि सकस आहार (बॅलेंस्ड आणि हेल्दी डाएट) घ्या.

Note: फोर्टिस मुलुंडच्या सीनियर गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉक्टर नूतन देसाई यांना गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपेटोलॉजीच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)