Parenting Tips: घरात लहान बाळ असेल तर प्रत्येक आई-वडिलांचे लक्ष त्याच्या प्रत्येक लहान गोष्टीकडे लागलेले असते. बाळाने किती दूध प्यायले, तो किती खेळला किंवा किती वेळ झोपला, या प्रत्येक गोष्टीची नोंदी पालक काळजीपूर्वक घेत असतात. पण तुम्ही कधी तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या पद्धतीकडे (Sleeping Position) नीट लक्ष दिले आहे का? अनेकदा बाळं अशा स्थितीत झोपतात, जी त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अशा वेळी, लहान मुलांसाठी झोपण्याची सर्वात सुरक्षित स्थिती कोणती आहे आणि कोणत्या स्थितीत त्यांना चुकूनही झोपवू नये, हे बालरोग तज्ज्ञांकडून (Pediatrician) जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बाळाला झोपवण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती?
या प्रश्नाचे उत्तर देताना, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. रवी मलिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
डॉ. मलिक यांनी सांगितलं की, बाळाला नेहमी पाठीवर (Back Sleeping Position) झोपवावे. ही पद्धत सर्वात सुरक्षित मानली जाते, कारण पाठीवर झोपल्यामुळे बाळाला श्वास घेण्याची प्रक्रिया सोपी आणि नैसर्गिक राहते. यामध्ये श्वास अडथळ्याशिवाय चालू राहतो.
( नक्की वाचा : Health Alert: ही चूक तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवेल! 'या' भाज्या पुन्हा गरम करणे टाळा, अन्यथा... )
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
सुरक्षित झोपेसाठी, पालकांनी खालील गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे:
मॅट्रेसची निवड: बाळाला नेहमी अशा गादीवर (Mattress) झोपवा, जी जास्त मऊ नसेल आणि जास्त कडकही नसेल. मॅट्रेस सपाट (flat) आणि मध्यम कडक असावा.
उशी (Pillow) टाळा: नवजात आणि लहान मुलांची मान खूप नाजूक असते. त्यामुळे त्यांना उशी अजिबात लावू नये. सपाट पृष्ठभागावर झोपणे त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे.
बाजूला काही नको: बाळाच्या झोपण्याच्या जागेच्या आसपास कोणतेही खेळणे (toys), मऊ वस्तू, अतिरिक्त उश्या, सॉफ्ट टॉय किंवा जड रजई नसावी. झोपेत या गोष्टी बाळाच्या चेहऱ्यावर येऊ शकतात आणि त्यांच्या श्वासोच्छ्वासामध्ये अडथळा निर्माण करू शकतात.
( नक्की वाचा : Healthy Diet: रोज मूठभर शेंगदाणे खा आणि 'या' गंभीर आजारांना ठेवा दूर! 3 व्हिटॅमिन्स'मुळे मिळतात जबरदस्त फायदे )
बाळाला 'या' स्थितीत कधीही झोपवू नका!
या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. मलिक सांगतात की, बाळाला कधीही पोटावर (Stomach/Tummy Sleeping Position) झोपवू नये. पोटावर झोपल्यामुळे बाळाचा श्वास थांबण्याचा धोका असतो.
यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये SIDS (Sudden Infant Death Syndrome) म्हणजेच 'अचानक बाळ मृत्यू सिंड्रोम' चा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे पोटावर झोपवण्याची पद्धत पूर्णपणे टाळायला हवी.
'टमी टाइम' कधी द्यावा?
डॉ. मलिक स्पष्ट करतात की, बाळाला 'टमी टाइम' (पोटावर घालणे) फक्त तेव्हाच द्यावा जेव्हा बाळ जागे असेल आणि आई-वडिलांच्या थेट निगराणीखाली (supervision) असेल. दिवसातून 2 ते 3 वेळा 'टमी टाइम' दिल्याने बाळाच्या मान, पाठ (Back) आणि खांद्यांचे (Shoulders) स्नायू (Muscles) मजबूत होतात. मात्र, हे पूर्णपणे लक्षात ठेवा की 'टमी टाइम' देताना एक क्षणही बाळापासून लांब जाऊ नका.
( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर अधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क या माहितीच्या जबाबदारीचा दावा करत नाही.)
पाहा डॉक्टरांचा Video