Parenting Tips:
मुलांना चांगल्या भविष्यासाठी पालक खूप मेहनत घेतात. आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर आणि सोपं व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. यासाठी मुलांना केवळ शिक्षण देणे हीच पालकांची जबाबदारी नसते. मुलांचे संगोपन करणे म्हणजे केवळ त्यांच्या शिक्षणाची फी भरणे नाहीतर चांगल्या गोष्टी समजावून सांगणे हे देखील असते. अभ्यासासोबत मुलांना नवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी मुलांना भविष्यात उपयोगी पडतात. प्रसिद्ध उद्योजिका आणि मोटिव्हेशनल स्पीकर सुधा मूर्ती नेहमी भाषणांमध्ये याबाबत काही टिप्स सांगतात, त्यावर एक नजर टाकुयात.
केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करू नका
केवळ अभ्यास आणि गूण याबाबतीत मुलाच्या मागे धावू नका. केवळ गुणांसाठी जर तुम्ही मुलांवर दबाव आणला तर ते अस्वस्थ होतील आणि तुमच्यापासून दूर राहू लागतील. अभ्यासासोबतच मुलाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या. यामध्ये मुलाच्या वैयक्तिक वाढीचाही समावेश होतो.
छोटे लक्ष्य बनवा
कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जे साध्य करण्यासाठी देखील वेळ लागतो. तुमची मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी, मुलासाठी लहान लक्ष्य सेट करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. जेणेकरून मुले त्यांना पूर्ण करू शकतील आणि आपले लक्ष्य साध्य करू शकेल. मुलांना हे करण्यात देखील आनंद होईल आणि ते अस्वस्थ देखील होणार नाहीत.
इतर अॅक्टिव्हिटी शिकवा
जीवनात केवळ अभ्यासच उपयोगी पडत नाही. यासोबतच तुम्ही इतरही अनेक गोष्टी मुलांना शिकवाव्यात. जेणेकरून तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकाल. मुलाचे संवादकौशल्य देखील चांगलं असलं पाहिजे.
मुलांची आवड जोपासा
तुमची स्वप्ने तुमच्या मुलावर लादू नका. तुमच्या मुलाकडून एखादी गोष्ट करुन घ्यायची असेल तर त्यात त्याला रस आहे की नाही हे विचारा. त्याला रस नसल्यास त्याच्यावर दबाव टाकू नका. त्याला काय करायला आवडते आणि त्याला त्याचे करिअर काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करू द्या.