जाहिरात

Paush Purnima 2026: पैसा-धान्याचे संकट होतील दूर, पौर्णिमेच्या दिवशी करा हा उपाय; मुहूर्त-पूजासामग्री नोट करा

Purnima 2026 Remedies For Money: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हा उपाय केल्यास घरामध्ये पैशांमध्ये बरकत येईल, धान्यदोष कमी होण्यासह अन्य मोठे लाभ मिळतील.

Paush Purnima 2026: पैसा-धान्याचे संकट होतील दूर, पौर्णिमेच्या दिवशी करा हा उपाय; मुहूर्त-पूजासामग्री नोट करा
"Purnima 2026 Remedies For Money: पौर्णिमा तिथीला करा एक पावरफुल उपाय"
Canva

- ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी  

Purnima 2026 Remedies For Money: प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीला घरामध्ये सत्यनारायणाची पूजा केल्यास घरातील आर्थिक अडथळे, धान्य दोष आणि मानसिक अस्थिरता यासारख्या समस्या दूर होईल. नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा 3 जानेवारी रोजी आहे. कोणत्या शुभ मुहूर्तावर सत्यनारायणाची पूजा करावी, पूजा सामग्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा तसेच या पूजेमुळे कोणते लाभ मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जानेवारी महिन्यात सत्यनारायण पूजन कधी करावे?

घरच्या घरी करा सत्यनारायण पूजन

जे भक्त दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतात, त्यांनी 3 जानेवारी 2026 (शनिवार) संध्याकाळी 6:30 वाजता (प्रदोषकाळ) सत्यनारायणाचे पूजन करावे.

प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा का करावी ?

ब्रह्मदेव जन्म देण्याचे कार्य करतात, भगवान विष्णु जन्मापासून मृत्यूपर्यंत पालनपोषण करतात आणि मृत्यूनंतर भगवान शंकर मुक्ती देण्याचे कार्य करतात, अशी मान्यता आहे. घरातील अन्न, धन, पालनपोषण ही जबाबदारी भगवान विष्णू यांच्यावर आहे. म्हणूनच घरातील अन्नधान्य आणि आर्थिक दोष, अडथळे, अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करण्याचा शास्त्रीय सल्ला दिला जातो.

अनेक घरांमध्ये खालील समस्या कारण न समजता जाणवतात 

  • घरामध्ये पैसा टिकत नाही
  • अनावश्यक खर्च वाढतो
  • अन्नाचे सेवन केल्यानंतरही तृप्ती मिळत नाही
  • धान्य लवकर संपते
  • घरात मनःशांती राहत नाही

अशा वेळेस सलग 12 पौर्णिमा तिथीस सत्यनारायण पूजा केल्यास बहुतांश समस्या आपोआप कमी झाल्याचे अनेकांचे अनुभव आहेत.

Paush Purnima 2026 Date: नववर्ष 2026मधील पहिली पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारीला? योग्य तारीख आणि उपाय वाचा

(नक्की वाचा: Paush Purnima 2026 Date: नववर्ष 2026मधील पहिली पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारीला? योग्य तारीख आणि उपाय वाचा)

सत्यनारायण पूजा म्हणजे धान्याची पूजा | Satyanarayan Puja Importance

वडीलधाऱ्या मंडळींना तुम्ही अनेकदा ही म्हण म्हणताना ऐकल असेल, "घरचं धान्य सरत नाही, विकतचं धान्य पुरत नाही.  कारण विकत आणलेल्या धान्याला अनेक हात लागलेले असतात. त्या धान्याचे दोष नष्ट करून ते पवित्र करण्यासाठी पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला सत्यनारायण पूजा करणं अतिशय महत्त्वाचे मानले जाते. जैसे खावे अन्न तसे उपजे मन म्हणून घरातील अन्न आणि धन पवित्र झाल्यानंतर घरात सुख, शांती, समाधान आणि बरकत नांदते; असे म्हणतात.

सत्यनारायण पूजेची योग्य वेळ | Satyanarayan Puja Shubh Muhurat | Paush Purnima 2026

प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतर सुमारे 24 मिनिटे या कालावधीत पूजा करावी.

सत्यनारायण पूजेसाठी लागणारी सामग्री | Satyanarayan Puja Samagri List
  • एक पाट
  • एक चौरंग
  • आंब्याच्या 4 डहाळ्या
  • अर्धा मीटर पांढरे कापड
  • ताम्हण, तांदूळ आणि बाळकृष्णाची मूर्ती
  • 3 सुपाऱ्या (गणपतीची मूर्ती, कुलदेवतेची प्रतिमा, वरुण)
  • पंचोपचार पूजा
  • प्रसादाचा शिरा 
  • सत्यनारायण पोथी
सत्यनाराणाची पूजा कशी करावी पूजा? कोणते उपाय करावे?
  • सत्यनारायण पूजेच्या पोथीचे पठण करावे.
  • पोथी पठणानंतर नैवेद्य अर्पण करावा, आरती करावी आणि प्रसादाचं वाटप करावे. 
  • प्रसाद केवळ घरातील सदस्यांनाचा द्यावा.
  • पूजा सामग्रीतील उरलेले गहू-तांदूळ घरातील धान्यात मिक्स करावे.
  • यामुळे धान्याचे दोष नष्ट होतात.
  • पैशांची बरकत येते.
  • घरात आनंदी, पवित्र वातावरण निर्माण होते. 

Shakambhari Purnima 2026 Date And Time: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या

(नक्की वाचा: Shakambhari Purnima 2026 Date And Time: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com