जाहिरात

Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा वाचा

Shakambhari Purnima 2026 Date And Time: माता शाकंभरी यांच्या प्राकट्याशी संबंधित शाकंभरी पौर्णिमा यंदा कधी आहे? देवीमातेची पूजा कशी करावी, संपूर्ण विधी आणि महत्त्व जाणून घेऊया... 

Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा वाचा
"Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे?"
Canva
  • पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा का साजरी केली जाते?
  • शाकंभरी जयंतीला गरजूंना दान करावे.
  • माता शाकंभरी आपल्या भक्तांना अन्न, आरोग्य आणि सुख-समृद्धी प्रदान करते.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Shakambhari Purnima 2026 Date And Time: सनातन परंपरेनुसार पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस शाकंभरी जयंती म्हणूनही ओळखला जातो. पौष पौर्णिमा म्हणजे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. शक्तीची साधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्नसंकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रकट झाल्या होत्या. हिंदू मान्यतेनुसार, आपल्या नावाप्रमाणेच माता शाकंभरी यांना भाजीपाला, फळे आणि हरिततेची देवी म्हणून पूजले जाते. यंदा शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, पूजा कशी करावी आणि धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया.

शाकंभरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त | Shakambhari Purnima 2026 Shubh Muhurat

पंचांगानुसार पौष महिन्याची पौर्णिमा तिथी 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53 वाजता सुरू होणार आहे आणि 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमेची पूजा आणि व्रत 3 जानेवारी 2026 रोजी करावे.  

New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक, शनीमुळे कोण होणार त्रस्त; 12 राशींचे 12 महिन्यांचे भविष्य

(नक्की वाचा: New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक, शनीमुळे कोण होणार त्रस्त; 12 राशींचे 12 महिन्यांचे भविष्य)

शाकंभरी मातेची पूजा विधी | Shakambhari Purnima 2026 Puja Vidhi

  • शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान-ध्यान करावे. 
  • यानंतर सर्व प्रथम देवी दुर्गेच्या या दिव्य स्वरूपाची विधीपूर्वक साधना-आराधना आणि व्रताचा संकल्प करावा. 
  • चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून देवीचे प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी आणि विधीवत पूजा करावी.
  • पूजा करताना मातेला गंगाजल, चंदन, कुंकू, अक्षता, फुले, फळे तसेच भाजीपाला अर्पण करावे. 
  • देवीच्या प्रकट दिनाच्या कथेचे पठण करावे किंवा कथा ऐकावी. 
  • पूजेच्या शेवटी देवीची आरती करायला विसरू नये. 
  • शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन फळे-भाजीपाला अर्पण करावा आणि गरजूंना दानही करावे, असे केल्याने पूजेचे पूर्ण पुण्यफळ प्राप्त होते; असे म्हणतात.
शाकंभरी देवीची कथा | Shakambhari Purnima 2026 Shakambhari Devi Katha

हिंदू मान्यतेनुसार, एकदा पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याच्या प्रकोपामुळे जवळपास 100 वर्षे पाऊस पडला नाही, यामुळे भयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अन्न आणि पाण्याअभावी जीवसृष्टी संकटात सापडली, तेव्हा देवी दुर्गेचे सौम्य स्वरूप माता शाकंभरी प्रकट झाल्या. मान्यतेनुसार शाकंभरी मातेचे 100 डोळे होते आणि जेव्हा त्यांच्या अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा संपूर्ण पृथ्वीवर जलप्रवाह सुरू झाला. त्यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा वध करून पृथ्वीला भाजीपाला, फळे, फुले आणि वनस्पतींनी हिरवेगार केले. देवीच्या या दिव्य स्वरूपाच्या उपासनेसाठी दरवर्षी पौष आणि माघ महिन्याच्या संधिकालात शाकंभरी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. 

New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

माता शाकंभरी पूजेचे महत्त्व | Shakambhari Purnima 2026 Puja Importance 

अन्न, फळे आणि पोषणाची देवी मानली जाणारी माता शाकंभरी राजस्थानातील सीकर येथे सकराय माता, तर सहारनपूर शहरामध्ये माँ शाकंभरी देवी या रुपात पूजली जाते. देवीच्या या मंदिरांत दर्शन आणि पूजन करण्यासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. हिंदू मान्यतेनुसार, देवी दुर्गेचे सौम्य स्वरूप मानल्या जाणाऱ्या माता शाकंभरी आपल्या भक्तांना अन्न, आरोग्य आणि सुख-समृद्धी प्रदान करते. त्या सर्व प्रकारचे दोष, दुष्काळ आणि संकटे दूर करून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे कल्याण करतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com