जाहिरात

Paush Purnima 2026 Date: नववर्ष 2026मधील पहिली पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारीला? योग्य तारीख आणि उपाय वाचा

Paush Purnima 2026 Date And Shubh Muhurat: कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णुंसह माता लक्ष्मी आणि चंद्रदेवतेची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. नववर्ष 2026 पहिली पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि उपाय...

Paush Purnima 2026 Date: नववर्ष 2026मधील पहिली पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारीला? योग्य तारीख आणि उपाय वाचा
"Paush Purnima 2026 Date And Shubh Muhurat: नववर्षातील पहिली पौर्णिमा कधी आहे?"
Canva

Paush Purnima 2026 Date And Shubh Muhurat: सनातन परंपरेमध्ये पौर्णिमा तिथी धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो. श्रद्धेने दर्शन आणि पूजा केल्यास चंद्रदेव भाविकांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात, असे म्हणतात. पौर्णिमा तिथी केवळ चंद्रदेवतेसाठीच नव्हे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या साधनेसाठीही विशेष फलदायी मानली जाते. पौष महिन्यातील पौर्णिमा तिथीस अधिक महत्त्व असते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी विधीवत पूजा, जप-तप आणि व्रत केल्यास जीवनातील सर्व दोष दूर दोऊन पुण्यप्राप्ती होते. पौष महिन्यातील पौर्णिमा कधी आहे, या दिवशी कोणते उपाय करावे आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया.. 

पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी 2026| पौष पौर्णिमा तिथी 2026 | Paush Purnima 2026 Date | Paush Purnima 2026 Tithi Time

  • पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी आरंभ वेळ : 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53 वाजता 
  • पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी समाप्त वेळ : 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 वाजता 

पौष महिन्यात पौर्णिमा कधी आहे? | नवीन वर्ष 2026मधील पौर्णिमा कधी आहे? | नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा कधी आहे?

पंचांगानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेची पूजा-व्रत 3 जानेवारी रोजी केली जाईल. 

Shakambhari Purnima 2026 Date And Time: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या

(नक्की वाचा: Shakambhari Purnima 2026 Date And Time: शाकंभरी पौर्णिमा कधी आहे, 2 की 3 जानेवारी? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी आणि कथा जाणून घ्या)

पौर्णिमेच्या दिवशी हे 5 उपाय करा

1. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास गंगा नदीमध्ये किंवा कोणत्याही पवित्र जलतीर्थावर स्नान करावे.असे करणे शक्य नसल्यास घरी स्नान करताना स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करावे. 

2. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो,असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंचे गुणगान करणाऱ्या कथांचे पठण करावे किंवा त्या कथा ऐकाव्या. तसेच श्री विष्णु सहस्रनामाचेही पठण करावे.

3. पौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू यांच्यासह माता लक्ष्मीच्या पूजेसाठीही अत्यंत शुभ मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती माता लक्ष्मी आणि नारायण यांची एकत्रित पूजा करतो, त्याच्या घरात सदैव या देवतांचा निवास राहतो, अशीही मान्यता आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने त्या व्यक्तीला कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.

New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

4. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासोबतच चंद्रदेवतेच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. सुख-समृद्धी, सौभाग्य आणि मनःशांतीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवतेला अर्घ्य अर्पण करावे आणि ‘ॐ स्रां स्रीं स्रौं सः चन्द्रमसे नमः' या मंत्राचा विशेष जप करावा.

5. मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करून वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेस पिंपळाचे झाड तसेच तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com