Paush Putrada Ekadashi 2025 Paran Muhurat: पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूंची भाविकांवर कृपा कायम राहते, असे म्हणतात. मान्यतेनुसार पौष पुत्रदा एकादशी व्रताचे पालन केल्यास पुण्यफळ मिळते. पण या व्रताची केवळ पूजाच नव्हे तर पारण देखील शुभ मुहूर्तावर करणे महत्त्वाचे मानले जाते.
पौष पुत्रदा स्मार्त एकादशी 2025 व्रत पारण मुहूर्त | 31 डिसेंबर 2025 | Paush Putrada Ekadashi 2025 Vrat Paran Time In Marathi | Pausha Putrada Ekadashi 2025 Vrat Paran Shubh Muhurat
पौष पुत्रदा एकादशी व्रताचे पारण 31 डिसेंबर रोजी म्हणजे द्वादशी तिथीला केली जाईल.
31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 01:48 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेदरम्यान व्रताचे पारण करू शकता. या कालावधीदरम्यान व्रताचे पारण करावे.
पौष पुत्रदा एकादशी व्रत पारण विधी (Paush Putrada Ekadashi 2025 Vrat Paran Vidhi)
- पुत्रदा एकादशीचे व्रताचे पारणाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान करावे.
- सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे.
- देवघर स्वच्छ करावे आणि गंगाजल शिंपडावे.
- भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची पूजा-प्रार्थना करावी.
- दिवा प्रज्वलित करून आरती करावी.
- मंत्रांचा जप आणि विष्णू चालीसाचे पठण करावे.
- सात्विक भोजनाचा नैवेद्य अर्पण करावा.
- नैवेद्यामध्ये तुळशीचे पान ठेवायला विसरू नका.
- नैवेद्य अर्पण केल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे आणि स्वतःही प्रसाद ग्रहण करावा.
- व्रताच्या पारणाच्या दिवशी गरजूंना अन्न-धनासह इत्यादी गोष्टींचे दान करावे.
- धार्मिक मान्यतेनुसार, द्वादशी तिथीच्या दिवशी दान केल्यास भाविकाला व्रत पूर्ण केल्याचे फळ मिळते आणि जीवनात कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही, असे म्हणतात.
(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)
पुत्रदा एकादशी व्रताचे पारण काय खाऊन करावे?
पौष पुत्रदा एकादशी व्रताचे पारण पूजापठण केल्यानंतर भगवान विष्णू यांना अर्पित करण्यात आलेल्या प्रसादाचे ग्रहण करणे फलदायी मानले जाते. तामसिक पदार्थांचे सेवन करणं टाळावे.
(नक्की वाचा: Negative Energy Removal Remedies: घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे नैराश्य येते? 9 उपाय करा पहिल्याच दिवशी दिसेल बदल)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)