Dal Cooking Tips: डाळ हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग आहे, पण बहुतांश लोक सर्व डाळी एकाच पद्धतीने शिजवतात. पण हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. चणा डाळ, मूग, तूर आणि मसूर प्रत्येक डाळ शिजवण्याची पद्धत वेगळी असते. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर डाळ एकतर खूप घट्ट होते किंवा कच्ची राहते. बहुतांश लोक आहारात नियमितपणे डाळीचा समावेश करतात. जर डाळ योग्य पद्धतीने शिजवली, तर ती केवळ चविष्टच नाही तर ती आरोग्यासाठी पोषणतत्त्वांचा खजिनाही ठरते. डाळीमध्ये प्रथिने (Protein), फायबर, लोह (Iron) आणि इतर पोषक तत्त्वांचा समावेश असतो, पण चुकीच्या पद्धतीने शिजवल्यास त्यातील पोषण मूल्य (Nutrition Value) कमी होऊ शकतात.
डाळ शिजवण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
डाळ शिजवण्यापूर्वी ती स्वच्छ धुणे आवश्यक आहे. अनेकजण डाळ थेट कुकरमध्ये टाकतात, ज्यामुळे त्यातील धूळ आणि स्टार्च पूर्णपणे निघत नाही. डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवावी. यामुळे डाळ लवकर शिजते आणि पचायला हलकी होते.
तूर डाळ कशी शिजवावी?
बहुतांश घरामध्ये तूर डाळीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तूर डाळ शिजवण्यापूर्वी 20-30 मिनिटे भिजत ठेवावी. कुकरमध्ये दोन- तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ उत्तम शिजते. जास्त शिजवल्याने तिची चव आणि पोत (Texture) खराब होऊ शकतो.
मसूर डाळ शिजवण्याची योग्य पद्धतमसूर डाळीमध्ये लोहाचे (Iron) प्रमाण जास्त असते आणि ही डाळ लवकर शिजते. 15-20 मिनिटे डाळ शिजण्यासाठी पुरेसे आहेत. कुकरऐवजी एखाद्या भांड्यात डाळ शिजवली तर डाळीची चव अधिक वाढते. लिंबू किंवा टोमॅटोसारखे आंबट पदार्थ शेवटी टाकावे, ज्यामुळे लोहाचे शोषण (Absorption) चांगले होते.
(नक्की वाचा: Homemade Limbu Pani Recipe: लिंबू पाणी बनवताना करताय ही चूक? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी)
चणा डाळ कशी शिजवावी?
चणा डाळ कमीत कमी एक तास पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. त्यानंतर कुकरमध्ये मध्यम आचेवर डाळ शिजवा. जास्त शिट्ट्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
(नक्की वाचा: Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत)
मूग डाळ कशी बनवावी?
मूग डाळ पचायला हलकी असते, म्हणूनच ती आजारी व्यक्ती किंवा डाएट करणाऱ्यांना दिली जाते. मूग डाळ कमी मसाल्यांमध्येही उत्तम लागते. मूग डाळ कायम गॅसच्या मंद आचेवर शिजवा आणि जास्त ढवळू नका, कारण यामुळे पोषक तत्त्वे कमी होऊ शकतात.
Photo Credit: NDTV Marathi
चव आणि आरोग्य वाढवण्यासाठी काही टिप्स
डाळीत मीठ आणि मसाले योग्य वेळी टाकणे महत्त्वाचे आहे. खूप जास्त तेल किंवा मसाल्यांमुळे डाळ जड होऊ शकते. डाळीला फोडणी नेहमी शेवटी द्यावी, जेणेकरून डाळीचा सुगंध आणि चव टिकून राहील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )