Shah Rukh Khan Vs Alakh Pandey: 'एडटेक' युनिकॉर्न 'फिजिक्सवाला' (PhysicsWallah) चे संस्थापक अलख पांडे यांनी संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला देखील मागे टाकले आहे. अलख पांडे यांची संपत्ती 223 टक्क्यांनी वाढून 14,510 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर, शाहरूख खानची निव्वळ संपत्ती12,490 कोटी आहे. 'हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025' मध्ये स्थान मिळाल्यामुळे पांडे सध्या चर्चेत आहेत.
अलख पांडे यांच्या संपत्तीत मोठी वाढ
फिजिक्सवालाने आर्थिक स्तरावर मोठी प्रगती साधली आहे. कंपनीची वेगाने वाढ होत असून, नफ्यातही सुधारणा झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये आपला नेट तोटा मागील वर्षीच्या 1,131 कोटींवरून कमी करून 243 कोटी केला. तर, उत्पन्न 1,940 कोटींवरून 2,886 कोटींपर्यंत वाढले आहे. हे आकडे कंपनीची मजबूत बाजारातील उपस्थिती (Market Presence) आणि दमदार वाढ दर्शवतात.
हॅरकॉर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीतून शिक्षण सोडल्यानंतर अलख पांडे यांनी 2016 मध्ये YouTube वर शिकवायला सुरुवात केली. एका ऑनलाईन शिक्षकापासून बिलियन डॉलर एडटेक कंपनीचे संस्थापक बनलेला त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
(नक्की वाचा- RBI Big News : EMI बुडाल्यास तुमचा फोन आता 'बंद' होणार? आरबीआय गव्हर्नरनं दिली 'ही' मोठी माहिती)
शाहरूख खान 'बिल्यनेअर क्लब'मध्ये
शाहरूख खाननेही यावर्षी आपल्या संपत्तीत 71 टक्क्यांची वाढ नोंदवत पहिल्यांदा 'बिल्यनेअर क्लब' मध्ये प्रवेश केला आहे. त्यांची पत्नी गौरी खानसोबत सह-मालकीची असलेली त्यांची प्रॉडक्शन कंपनी 'रेड चिलीज एंटरटेनमेंट'ने FY23 मध्ये 85 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. याव्यतिरिक्त, त्यांच्या 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने देशांतर्गत 640.25 कोटी आणि जगभरात 1,160 कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत भर पडली.
फिजिक्सवालाच्या 'आयपीओ'ची योजना
फिजिक्सवाला कंपनीने 3,820 कोटींच्या आयपीओसाठी SEBI कडे कागदपत्रे सादर केली आहेत. या ऑफरिंगमध्ये 3,100 कोटींचा नवीन इश्यू आणि 720 कोटींचा 'ऑफर-फॉर-सेल' (OFS) समाविष्ट आहे.