जाहिरात

Pigeon Repellent Ideas: तुमच्याही बाल्कनी, खिडकीवर कबूतर करतायेत घाण; समस्या दूर करण्यासाठी फॉलो करा 9 टिप्स

Pigeon Repellent Ideas: बाल्कनीतील कबूतरांच्या घाणीमुळे आणि आवाजामुळे त्रस्त आहात का? कबूतरांना इजा न पोहोचवता त्यांना पळवून लावण्याचे फॉलो करा 9 प्रभावी उपाय. सविस्तर माहितीसाठी क्लिक करा.

Pigeon Repellent Ideas: तुमच्याही बाल्कनी, खिडकीवर कबूतर करतायेत घाण; समस्या दूर करण्यासाठी फॉलो करा 9 टिप्स
"Pigeon Repellent Home Remedy: कबूतर पळवून लावण्यासाठी 9 उपाय"
NDTV Marathi

Pigeon Repellent Ideas: तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर खिडकीवर गुटरगूंचा आवाज आणि सगळीकडे त्यांची विष्ठा (घाण) दिसते का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या काळात शहरांमध्ये विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत ही एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे बाल्कनीत बसता येत नाही, कपडे सुकवता येत नाहीत आणि खिडक्या उघडायलाही भीती वाटते. खरं तर कबूतराची विष्ठा केवळ घर घाण करत नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत धोकादायक असते. यामुळे श्वसनाचे विकार आणि अनेक प्रकारचे संसर्ग पसरू शकतात. जर तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल, तर हे सोपे उपाय नक्की करून पाहा.

कबूतर बाल्कनीत का येतात?

सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की, कबूतर तुमच्या घराचीच निवड का करतात. कबूतरांना उंच, सुरक्षित आणि सपाट जागा आवडतात. जिथे ते आपले घरटे बांधू शकतात आणि अंडी घालू शकतात. आपल्या बाल्कनी, एसीवरील जागा आणि खिडक्यांचे सनशेड्स त्यांच्यासाठी अगदी योग्य ठिकाणे असतात.

कबूतर पळवून लावण्यासाठी करा हे उपाय (How To Scare Away Pigeons)

1. बाल्कनी आणि खिडकीची स्वच्छता 

कबूतरांना पळवून लावण्याचा पहिला आणि मूलभूत मार्ग म्हणजे स्वच्छता. बाल्कनी दररोज स्वच्छ करा. जर त्यांनी विष्ठा केली असेल, तर ती लगेच साफ करा. कबूतर त्यांच्या विष्ठेच्या वासावरून आपली जागा ओळखतात. जर वास नसेल, तर ते पुन्हा येणार नाही. स्वच्छता करताना मास्क आणि हातमोजे नक्की वापरा.

2. ॲल्युमिनियम फॉइल

तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलच्या पट्ट्या कापून बाल्कनीच्या रेलिंगवर किंवा खिडकीजवळ लटकवू शकता. ॲल्युमिनियम फॉइलवरील चमकेमुळे कबूतर येण्यास घाबरतात.

3. प्लास्टिकचे पक्षी

बाजारात प्लास्टिकचे घुबड किंवा इतर शिकारी पक्षी मिळतात. हे बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कबूतरांना दिसतील. त्यांना खरा शिकारी समजून कबूतर घाबरतील आणि पळून जातील.

4. विंड चाइम्स

बाल्कनीमध्ये एखादे छान विंड चाइम लटकवा. वाऱ्यामुळे जेव्हा त्याचा आवाज होईल, तेव्हा कबूतर त्रासून पळून जातील. हे दिसायलाही चांगले वाटते आणि घरात सकारात्मक ऊर्जाही येते.

(नक्की वाचा: Burning Feet Syndrom: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तळपायात जळजळ होते? दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या माहिती)

5. बर्ड स्पाइक्स (Bird Spikes)

बर्ड स्पाइक्स प्लास्टिक किंवा स्टीलचे बनलेले असतात, ज्यात टोकदार खिळ्यांसारखे भाग बाहेर आलेले असतात. हे बाल्कनीच्या रेलिंगवर, खिडकीच्या सनशेडवर किंवा एसीवर बसवा. यामुळे कबूतर तिथे बसू शकणार नाहीत.

6. डबल-साइडेड टेप

रेलिंगवर डबल-साइडेड टेप चिकटवा. जेव्हा कबूतरांचे पंजे यावर चिकटतील, तेव्हा त्यांना ते विचित्र वाटेल आणि ते पळून जातील.

7. काळ्या मिरीचा स्प्रे

काळी मिरी पाण्यात उकळून त्याचा स्प्रे तयार करा आणि बाल्कनीच्या कोपऱ्यात आणि रेलिंगवर काळ्या मिरीचे पाणी शिंपडा.

(नक्की वाचा: Career Tips: करिअरमध्ये यशस्वी कसे व्हावे? क्षेत्र निवडण्यापूर्वी योगगुरूंकडून जाणून घ्या यशाचा मूलमंत्र)

8. पांढरं व्हिनेगर (White Vinegar)

व्हिनेगरचा वास खूप तीव्र असतो. एखादा कपडा व्हिनेगरमध्ये भिजवून बाल्कनीत ठेवा किंवा व्हिनेगर मिसळलेल्या पाण्याने बाल्कनी स्वच्छ करा. हा वास कबूतरांना आवडत नाही.

9. डांबर गोळ्या (Naphthalene Balls)

बाल्कनीच्या कोपऱ्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवा. त्यांच्या तीव्र वासामुळे कबूतर लांब राहतात.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com