PM Modi 75th Birthday: फिट राहण्यासाठी PM मोदी अशी लाइफस्टाइल फॉलो करतात, एनर्जीचे रहस्य जाणून घ्या

PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी फिट राहण्यासाठी अशा पद्धतीची लाइफस्टाइल फॉलो करतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसचे रहस्य"

PM Modi 75th Birthday: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. देशासह जगभरातील नेते आणि दिग्गज मंडळी PM मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. PM नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील अशा नैत्यांपैकी एक आहेत, जे वयाच्या पंच्याहत्तरीमध्येही प्रचंड फिट आणि अ‍ॅक्टिव्ह आहेत. आरोग्याशी संबंधित प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टींची ते काळजी घेतात, म्हणूनच काही तास झोप घेऊनही PM मोदी उत्तमरित्या सक्रिय असतात. तुम्हालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे फीट राहायचंय का? तर जाणून घेऊया त्यांची जीवनशैली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फिटनेस रुटीन | PM Modi Fitness Routine

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे 4 वाजता उठतात आणि यानंतर योगासनांचा सराव करतात. 
  • योग त्यांच्या निरोगी आरोग्य आणि फिटनेसचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. 
  • योगव्यतिरिक्त ते एकाग्रता आणि मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा देखील करतात. 
  • वेळ मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळ वॉकही करतात. 
  • यानंतर सकाळी जवळपास 7-8 वाजेदरम्यान नाश्ता करतात. 
  • नाश्त्यामध्ये पचनास हलक्या पदार्थांचा समावेश असतो, उदा- पोहे, खाकरा, स्प्राऊट्स, इत्यादी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम गरम पाणी पितात, हा त्यांचा रुटीनचा भाग आहे.  
  • दुपारच्या जेवणामध्ये बाजरीची पोळी किंवा खिचडी खाणे ते पसंत करतात. 
  • दिवसभरात ते एखादं फळ खातात, फळांच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते. 
  • रात्री देखील PM मोदी हलक्या स्वरुपातील आहाराचे सेवन करतात, त्यांच्या रात्रीच्या जेवणात पोळी-भाजी आणि सूपचा समावेश असतो. 

(नक्की वाचा: PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील)

पंतप्रधान मोदी फास्टिंगचाही आधार घेतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शरीराची इंद्रिये सक्रिय राहण्यासाठी ते उपवासही करतात. उपवास सुरू करण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पितात, असेही PM मोंदीनी सांगितले होते. यामुळे शरीर डिटॉक्स होते. चातुर्मासाच्या नियमांचं पालन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होते. यादरम्यान जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांचे इंटरमिटेंट फास्टिंग सुरू असते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)