Promise Day Quotes For Myself : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. ११ फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे आहे. प्रॉमिस डेला विशेष महत्त्व असतं. या दिवशी, आपण आपल्या जोडीदारांना, मित्रांना किंवा कुटुंबाला प्रॉमिस देतो. पण तुम्ही कधी स्वतःला वचन दिलं आहे का? या धकाधकीच्या जीवनात तुम्ही स्वतःसाठी कधी काही केलं आहे का? आज, आम्ही तुम्हाला पाच महत्त्वाच्या प्रॉमिसबद्दल सांगणार आहोत. असं प्रॉमिस स्वत:ला दिलं तर तुम्ही आयुष्यात सकारात्मकता आणू शकता.
मी स्वतःला वचन देते की...
आरोग्याची काळजी घेईन : काम, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या प्रॉमिस डेला, स्वतःला वचन द्या की तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल. वेळेवर जेवण करा. पुरेशी झोप घ्या आणि दररोज काही वेळ पायी चाला.
स्वतःसाठी वेळ काढा : नेहमी इतरांसाठी उपलब्ध राहिल्याने थकवा आणि ताण वाढू शकतो. म्हणून फार काळजीत राहू नका. प्रॉमिस डेला स्वतःला वचन द्या की, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. थोडासा 'मी-टाईम' काढा, मग तो फिरायला जाणे असो किंवा तुम्हाला आवडणारं काहीतरी करणं असो.
स्वत:च्या भावना समजून घ्या : कधीकधी आपण आपल्या भावना दाबुन ठेवतो, अनेकदा या भावना व्यक्त करणं सोपं नसतं. या प्रॉमिस डेला, स्वतःला वचन द्या की तुम्ही तुमच्या भावना समजून घ्याल आणि स्वीकाराल. यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
स्वतःवर प्रेम करा : या प्रॉमिस डेला स्वतःला वचन द्या की, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. तुमच्या चुका स्वीकाराल, स्वतःला माफ कराल आणि तुमच्या चांगल्या सवयींवर लक्ष केंद्रित कराल.
स्वतःची तुलना इतर कुणाशीही करू नका : सोशल मीडियाच्या युगात, आपण सतत स्वतःची तुलना इतरांशी करीत असतो. या प्रॉमिस डेला, स्वतःला वचन द्या की, तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करणार नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आपण आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायलं हवं.
(NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)