Frequent Urination: रात्री वारंवार लघवी होते? असू शकतो हा भयंकर कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितले 3 मोठी लक्षणे

Prostate Cancer Symptoms in Marathi: भारतीय पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी लघवीतील बदल किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या कोणत्या 3 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Prostate Cancer Symptoms in Marathi: वारंवार लघवीला होतेय? वेळीच व्हा सावध"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ICMRनुसार प्रोस्टेट कॅन्सर भारतीय पुरुषांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे
  • रात्री वारंवार लघवी होणे, लघवीची धार कमकुवत होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन हे प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे
  • प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्राशयावर दाब पडतो, यामुळे वारंवार लघवी होत असल्याचे जाणवते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Frequent Urination Symptoms: इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चनुसार (Indian Council of Medical Research-ICMR) प्रोस्टेट कॅन्सर आता भारतीय पुरुषांमध्ये होणाऱ्या 10 सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक ठरतोय. नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये याची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. पण चिंतेची बाब म्हणजे भारतातील 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये या आजाराचे निदान तेव्हा होते जेव्हा शरीरात कॅन्सर खूप वाढलेला असतो. याउलट अनेक पाश्चात्य देशांमध्ये नियमित तपासणीमुळे हा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखला जातो. एकीकडे लोक मधुमेह (डायबिटीज), लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूक होत असताना पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरबाबत आजच्या काळातही कमी चर्चा होते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनेक पुरुष लघवीतील किंवा लैंगिक आरोग्यातील बदलांना वाढत्या वयाचा सामान्य परिणाम मानून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण असे करणे धोकादायक ठरू शकते.

याच गोष्टीचा विचार करून FMRI चे युरोलॉजी डायरेक्टर आणि रोबोटिक युरोलॉजिकल सर्जरी प्रमुख डॉक्टर विक्रम शर्मा यांनी असे 3 संकेत सांगितले आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

Advertisement

प्रोस्टेट कॅन्सरचे तीन संकेत | Prostate Cancer Symptoms
 
1. रात्री वारंवार लघवीला जावे लागणे | Nocturia Frequent Urination At Night

जर तुम्हाला रात्रीच्या वेळी अनेक वेळा उठून लघवीला जावे लागत असेल, तर याला वैद्यकीय भाषेत 'नोक्टुरिया' (Nocturia) म्हटले जाते. अनेक लोक याला जास्त पाणी पिण्याचा किंवा वाढत्या वयाचा परिणाम मानतात, पण हा प्रोस्टेटच्या समस्येचा सुरुवातीचा संकेत असू शकतो. प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे लघवीच्या नळीवर (युरेथ्रा) दाब पडतो, ज्यामुळे मूत्राशयाला (ब्लॅडर) जास्त मेहनत करावी लागते. काळानुरूप ब्लॅडर अधिक संवेदनशील होते आणि वारंवार लघवीची गरज जाणवू लागते.

(नक्की वाचा : गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा)

2. लघवीची धार कमकुवत होणे |  Weak Urine Stream Causes

डॉक्टर शर्मा यांच्या मते लघवीची धार कमी होणे, लघवी सुरू करताना जोर लावावा लागणे किंवा थेंब-थेंब लघवी होणे या अशा समस्या आहेत. ज्यांना लोक अनेकदा वाढत्या वयाचा सामान्य भाग समजतात. वास्तविक पाहता हे संकेत वाढलेल्या प्रोस्टेटचे असू शकतात. दीर्घकाळापर्यंत या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वारंवार युरिन इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग) होऊ शकते, मूतखडे होण्याचा धोका वाढू शकतो, किडनीचे नुकसान होऊ शकते आणि ब्लॅडरची कार्यक्षमता कमकुवत होऊ शकते.

(नक्की वाचा: Fatty Liver: सावधान! जे तुम्ही हेल्थ ड्रिंक समजून पिताय तोच ज्युस लिव्हर खराब करतोय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा)

3. अचानक किंवा हळूहळू इरेक्टाइल डिसफंक्शन होणे | Erectile Dysfunction And Prostate Cancer

इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच पुरुषांना इरेक्शन होण्यात किंवा ते टिकवून ठेवण्यात अडचण येणे. अनेक लोक याला केवळ ताणतणाव, थकवा किंवा वाढत्या वयाचा परिणाम मानतात, पण हा प्रोस्टेटशी संबंधित समस्येचा संकेत देखील असू शकतो. जर प्रोस्टेटमध्ये सूज किंवा एखादी गाठ असेल तर त्याचा परिणाम इरेक्शनमध्ये मदत करणाऱ्या नसा आणि रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो. म्हणूनच या समस्येकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Rusted Knife Health Risks: सावधान! गंजलेल्या चाकूने फळं-भाज्या कापताय? FSSAIने दिला कडक इशारा)

वेळेत तपासणी करणे का गरजेचे आहे?

डॉक्टर विक्रम शर्मा यांच्या मते, भारतात प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत, पण अनेक पुरुष वेळेवर तपासणी करत नाहीत, ज्यामुळे आजाराचे निदान उशीरा होते.

  • डॉक्टरांनी सल्ला दिलाय की,  45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी प्रोस्टेटच्या नियमित तपासणीबाबत तज्ज्ञांशी बोलले पाहिजे.
  • ज्यांच्या कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास (फॅमिली हिस्टरी) आहे, त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
  • PSA ब्लड टेस्ट आणि DRE तपासणीमुळे प्रोस्टेटच्या समस्येचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होण्यास मदत होऊ शकते.
  • जर प्रोस्टेट कॅन्सरचे निदान सुरुवातीलाच झाले, तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते. 
  • दुसरीकडे लक्षणे वाढण्याची वाट पाहिल्यास आजार गंभीर होऊ शकतो आणि उपचार करणे देखील कठीण होऊ शकते. 
  • त्यामुळे कोणत्याही असामान्य लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर तपासणी करून घ्यावी.

NOTE: डॉक्टर विक्रम शर्मा हे FMRI, गुरुग्राम येथे युरोलॉजी, अँड्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीचे डायरेक्टर आहेत. ते रोबोटिक युरोलॉजिकल सर्जरीचे प्रमुख देखील आहेत. 36 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासह ते भारतातील युरोलॉजी क्षेत्रातील सर्वात जुन्या आणि नामांकित डॉक्टरांपैकी एक आहेत. ते आपल्या क्षेत्रात नवीन उपचार पद्धती आणि तंत्रज्ञान आणण्यासाठी ओळखले जातात.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )