सावधान! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, डॉक्टरसह मुलीलाही संसर्ग 

पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्यात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Zika Virus : पुण्यातील एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या 15 वर्षीय मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे आल्याची सौम्य लक्षणे आढळली होती. सध्या या दोघांवरही औषधोपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. खबरदारी म्हणून या प्रकरणी महापालिकेकडूनही प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्यात आहेत. शहरामध्ये यंदा प्रथमच झिका व्हायरसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत? 

- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.

- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -14 मध्ये निदर्शनास येतात. 

- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. 

- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.

(नक्की वाचा: फळे-भाज्या केवळ पाण्याने नव्हे तर अशा पद्धतीने करा स्वच्छ, अन्यथा पोटात जातील धोकादायक कीटक)

(नक्की वाचा: 'हे' 5 उपाय केल्यास तुमच्या जवळपासही फिरकणार नाही डेंग्यूचा डास)

Zika Virus In Pune | मोठी बातमी : पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, एरंडवण्यात आढळले दोन रुग्ण