जाहिरात

फळे-भाज्या केवळ पाण्याने नव्हे तर अशा पद्धतीने करा स्वच्छ, अन्यथा पोटात जातील धोकादायक कीटक

How To Clean Vegetables : तुम्ही देखील बाजारातून फळे-भाज्या खरेदी करून आणल्यानंतर केवळ पाण्यानेच स्वच्छ धुऊन खाता का? मग आजपासून असे करणे बंद करा. कारण केवळ पाण्यामुळे भाज्या-फळे पूर्णपणे स्वच्छ होतच नाहीत. फळे-भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया...

फळे-भाज्या केवळ पाण्याने नव्हे तर अशा पद्धतीने करा स्वच्छ, अन्यथा पोटात जातील धोकादायक कीटक

Soaking Fruit And Vegetable: फळे-भाज्या खाण्यापूर्वी केवळ पाण्याने धुणे पुरेसे नसते. कारण यावरील जंतू-कीटकनाशके पूर्णतः स्वच्छ होऊ शकत नाहीत. हा धोका लक्षात घेता फळे आणि भाज्या स्वच्छ धुण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरणे आवश्यक आहे. यासाठी आपण घरच्या घरीच सोल्युशन तयार करू शकता. या सोल्युशनचा योग्य पद्धतीने वापर केला तर फळे-भाज्यांवरील जंतुंचा (how to clean bacteria)  खात्मा होण्यास मदत मिळू शकते. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती...

बेकिंग सोडा आणि पाण्याचे सोल्युशन 

फळे आणि भाज्यांवरील कीटनाशक स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आता या पाण्यामध्ये फळे-भाज्या 15 मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे भाज्यांवरील कीटकनाशक व जंतुंची समस्या 99 टक्के दूर होते.   

(नक्की वाचा: Yoga Day 2024: बेलीफॅटपासून हवीय सुटका? करा या आसनाचा नियमित सराव)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Unsplash

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर केल्यास भाज्या आणि फळे जंतूमुक्त होण्यास मदत मिळते. एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ मिक्स करा. यानंतर पाच ते 10 मिनिटे भाज्या-फळे या पाण्यात भिजत ठेवा. हातांनी भाज्या- फळे स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे जंतू आणि कीटकनाशकांची समस्या दूर होईल. 

(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचनप्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

मीठ आणि कोमट पाणी 

भाज्या आणि फळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वच्छ करायचे असतील तर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. फळे आणि भाज्या 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर मऊ कापडावर भाज्या पसरवा. घरच्या घरी खिशाला परवडणारे सोल्यशुन तयार करून तुम्ही भाज्या-फळांवर जमा झालेले कीटकनाशक आणि जंतू हटवण्याचे काम करू शकता.  

(नक्की वाचा: Health Tips: नेहमीच्या चहाऐवजी प्या 'हा' पिवळ्या रंगाचा चहा)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com