
Putrada Ekadashi 2025 : तसं पाहता एका वर्षभरात 24 एकादशी येतात आणि दर महिन्याला दोन एकादशी येतात. यातील काही एकादशी या सर्व एकादशींपेक्षा मोठ्या मानल्या जातात. श्रावण महिन्यातील एकादशीदेखील महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. यावर्षी 5 ऑगस्ट रोजी ही एकादशी आली आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशीही म्हटले जाते. ही एकादशी दरवर्षी श्रावणातील शुक्ल पक्षाला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, पुत्रदा एकादशीचं व्रत करणाऱ्यांना पूत्र प्राप्तीमध्ये येणारी बाधा दूर होते.
पुत्रदा एकदशीची पूजा कधी करावी?
हिंदू पंचांगानुसार, श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11.41 वाजता सुरू होईल. याचा शेवट दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला दुपारी 1.12 वाजता होईल. उदय तिथीला हिंदू धर्मात मान्यता असल्याने, पुत्रदा एकादशी 5 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. त्याच वेळी, 6 ऑगस्ट रोजी सकाळी 07.15 ते 8.21 पर्यंत उपवास संपेल.
नक्की वाचा - Shravan 2025 Vrat Importance: श्रावणातील शिवपूजनाचे महत्त्व, नक्त व्रत आणि या 2 तिथीला अभिषेक करणे ठरेल फलदायी
पुत्रदा एकादशीची पूजा कशी कराल?
- सकाळी उठल्यावर आंघोळ आणि इतर गोष्टी उरकून स्वच्छ कपडे परिधान करा.
- घराच्या मंदिराची स्वच्छता करा आणि एका पाट्यावर भगवान विष्णूच्या प्रतिमेची स्थापना करा.
- पूजादरम्यान धूप-दीप, फूल-माळा, बेलपत्र, फूलं चढवावेत.
- यानंतर रोली, कुंकू आणि नैवेद्यासह एकूण 16 साहित्याचं अर्पण करावं.
- यानंतर भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी.
- पूत्रदा एकादशीची कथा म्हणावी आणि शेवटी आरती करा.
- देवासमोर एकादशी व्रत करण्याचा संकल्प करा.
पुत्रदा एकादशी पूजा सामग्री (Putrada Ekadashi 2025 Puja Samagri)
भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा
लाकडी पाट किंवा चौरंग
पिवळं वस्त्र
बसण्यासाठी आसन
शुद्ध जल किंवा गंगाजल
पिवळं वस्त्र
पिवळे फूलं
तुळस
पिवळे फळ
मिठाई
दिवा
धूप
तूप
आरती
पुजेच्या कथेचं पुस्तक
पुत्रदा एकादशी पूजा विधी (Putrada Ekadashi 2025 Vrat Vidhi)
पुत्रदा एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या एक दिवस आधी सात्वित अन्नग्रहण करावं. याशिवाय संयमित आणि ब्रम्हचर्याचं पालन करावं. सर्वात आधी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर देवाचं ध्यान करावं. शंखात पाणी घेऊन प्रतिमेवर अभिषेक करा. भगवान विष्णूना चंदनाचा टिळा लावावा. यानंतर तांदूळ, फूल, अत्तर, अबीर, गुलाल याच्या मदतीने भगवानाची पूजा करावी. देवाच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं. देवाला फळाचा नैवेद्य द्यावा. यानंतर खीरेचा नैवेद्य द्यावा. यानंतर पुत्रदा एकादशीची कथा ऐकावी आणि सोबतच श्री हरि विष्णू भगवानची आरती करा. हे व्रत निर्जल ठेवलं जातं. मात्र पाणी शिवाय उपवास करता येत नसेल तर संध्याकाळी दिवा लावताना फळाहार करू शकता. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला गरजू व्यक्तीला भोजन देत उपवास सोडावा.
पुत्रदा एकादशीची आरती (Putrada Ekadashi 2025 Aarti)
ॐ जय एकादशी, जय एकादशी, जय एकादशी माता ।
विष्णु पूजा व्रत को धारण कर, शक्ति मुक्ति पाता ।। ॐ।।
तेरे नाम गिनाऊं देवी, भक्ति प्रदान करनी ।
गण गौरव की देनी माता, शास्त्रों में वरनी ।।ॐ।।
मार्गशीर्ष के कृष्णपक्ष की उत्पन्ना, विश्वतारनी जन्मी।
शुक्ल पक्ष में हुई मोक्षदा, मुक्तिदाता बन आई।। ॐ।।
पौष के कृष्णपक्ष की, सफला नामक है,
शुक्लपक्ष में होय पुत्रदा, आनन्द अधिक रहै ।। ॐ ।।
नाम षटतिला माघ मास में, कृष्णपक्ष आवै।
शुक्लपक्ष में जया, कहावै, विजय सदा पावै ।। ॐ ।।
विजया फागुन कृष्णपक्ष में शुक्ला आमलकी,
पापमोचनी कृष्ण पक्ष में, चैत्र महाबलि की ।। ॐ ।।
चैत्र शुक्ल में नाम कामदा, धन देने वाली,
नाम बरुथिनी कृष्णपक्ष में, वैसाख माह वाली ।। ॐ ।।
शुक्ल पक्ष में होय मोहिनी अपरा ज्येष्ठ कृष्णपक्षी,
नाम निर्जला सब सुख करनी, शुक्लपक्ष रखी।। ॐ ।।
योगिनी नाम आषाढ में जानों, कृष्णपक्ष करनी।
देवशयनी नाम कहायो, शुक्लपक्ष धरनी ।। ॐ ।।
कामिका श्रावण मास में आवै, कृष्णपक्ष कहिए।
श्रावण शुक्ला होय पवित्रा आनन्द से रहिए।। ॐ ।।
अजा भाद्रपद कृष्णपक्ष की, परिवर्तिनी शुक्ला।
इन्द्रा आश्चिन कृष्णपक्ष में, व्रत से भवसागर निकला।। ॐ ।।
पापांकुशा है शुक्ल पक्ष में, आप हरनहारी।
रमा मास कार्तिक में आवै, सुखदायक भारी ।। ॐ ।।
देवोत्थानी शुक्लपक्ष की, दुखनाशक मैया।
पावन मास में करूं विनती पार करो नैया ।। ॐ ।।
परमा कृष्णपक्ष में होती, जन मंगल करनी।।
शुक्ल मास में होय पद्मिनी दुख दारिद्र हरनी ।। ॐ ।।
जो कोई आरती एकादशी की, भक्ति सहित गावै।
जन गुरदिता स्वर्ग का वासा, निश्चय वह पावै।। ॐ ।।
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world