Raksha Bandhan 2025: यंदाचा रक्षाबंधन अनेक अर्थांनी खास असणार आहे. यंदाच्या ग्रह नक्षत्रांच्या विशिष्ट स्थितीमुळे यंदाच्या रक्षाबंधनाच्या तारखेबद्दल कोणताही संभ्रम नाही. या वर्षी रक्षा बंधनाचा सण 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे महत्त्व काय आहे हे डॉ. शक्तिधर शर्मा यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या दिवशी चंद्र मकर राशीत असून पत्रिकेमध्ये सूर्य-चंद्र 180 अंशावर म्हणजेच समोरासमोर येणार आहे आणि हा एक दुर्मीळ योग मानला जातो.
( नक्की वाचा: राखी कधी बांधावी, भावाने राखी कशी काढावी ? )
बहिणीने भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहुर्त कोणता ?
रक्षाबंधनसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:21 वाजेपासून दुपारी 1:24 वाजेपर्यंत आहे. या वेळेत बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात. दुपारी 1:24 वाजेनंतर भाद्रपद सुरू होत असल्याने त्यानंतर राखी बांधणे शुभ मानले जात नाही.
रक्षा बंधनाला जुळून आलेले अनोखे योग कोणते ?
- या रक्षाबंधनाला सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग्य योग जुळून येत आहेत. याशिवाय श्रवण नक्षत्र असल्यामुळे हा दिवस अधिक विशेष ठरतो.
- सौभाग्य योग: 9 ऑगस्ट रोजी सुरू होऊन 10 ऑगस्टच्या पहाटे 2:15 वाजेपर्यंत हा योग राहील.
- सर्वार्थ सिद्धी योग: 9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:47 पासून दुपारी 2:23 वाजेपर्यंत हा योग असेल.
- श्रवण नक्षत्र: हे नक्षत्र 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:23 वाजेपर्यंत असेल.
- याशिवाय याच दिवशी करण बव आणि बलवचा योगही जुळून येत आहे, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
पंचकाला लोक का घाबरतात ?
या वर्षीचा रक्षाबंधन पंचक आणि भद्रापासून मुक्त आहे. 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच भद्राकाल समाप्त होत असल्याने ही एक चांगली गोष्ट आहे.पंचक 10 ऑगस्ट रोजी पहाटे 4:11 वाजता सुरू होईल. पंचकामध्ये सुरू केलेल्या कामाचा लाभही पाचपट होतो आणि नुकसानही पाचपट होते, त्यामुळे बरेच लोक पंचकाला घाबरतात. पण रक्षाबंधन हे पंचक सुरू होण्यापूर्वीच संपेल.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन कधी आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट?)
सौभाग्य आणि सिद्धी योगाचे महत्त्व काय आहे ?
सौभाग्य योग कुटुंबात समृद्धी आणि भरभराट आणतो असे मानले जाते. तर सर्वार्थ सिद्धी योग सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि कामांमध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. हे दोन्ही योग श्रावण नक्षत्रात येत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)