
Raksha Bandhan 2025 Date And Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025 Date) म्हणजे भाऊबहिणीचे अतूट नाते दर्शवणारा सोहळा. मान्यतांनुसार या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी (Rakh 2025) बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ त्याच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबहिणीचे नाते म्हणजे तुझेमाझे जमेना आणि तुझ्याविना करमेना. या दिवसाचे धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या (Raksha Bandhan 2025 Date) प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यंदा कधी साजरा करण्यात येणार आहे? सणावर भद्र काळाचे सावट आहे की नाही? कोणत्या मुहूर्तावर राखी (Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat) बांधावी? सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...
यंदा रक्षाबंधन कधी आहे?| Raksha Bandhan 2025 Date | Raksha Bandhan Kadhi Ahe?
पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथीस 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता शुभारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.21 वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथी लक्षात घेता यंदा रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: तुमच्या भावाची होईल मोठी प्रगती, ज्योतिषींच्या माहितीनुसार रक्षाबंधनाला बांधा अशी राखी)
रक्षाबंधन सणावर भद्र काळाचे सावट आहे की नाही?
भद्र काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानले जात नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सणादरम्यान भद्र काळाचे सावट आहे की नाही? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे. पण यंदा भद्र काळाचे सावट नाहीय, त्यामुळे चिंता नसावी.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat)
9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:35 वाजेपासून ते दुपारी 1:24 वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरेल. याव्यतिरिक्त अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 वाजेपासून ते दुपारी 12:53 वाजेदरम्यान आहे. या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: भाऊ किंवा बहीण नसेल तर कोणी कोणाला राखी बांधावी?)
भावाने राखी कधी काढावी?
मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासांनंतर काढली जाऊ शकते. जन्माष्टमी सणाच्या दिवशीही राखी काढली जाऊ शकते. काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोवर ते काढत नाहीत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world