Ram Navami 2026: राम नवमी कधी साजरी करावी? 26 की 27 मार्च? जाणून घ्या अचूक तारीख, मध्यान्ह काळ आणि शुभ मुहूर्त

Ram Navami 2026 Date: वर्ष 2026मध्ये राम नवमीच्या अचूक तारखेबाबत लोकांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घेऊया राम नवमीची अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबाबत माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
Ram Navami 2026 Date : राम नवमी कधी आहे?
Canva

Ram Navami 2026 Date And Time: देशभरात राम नवमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा राम नवमीच्या (Ram Navami 2026 Date News) तारखेबाबत लोकांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे 26 मार्च की 27 मार्च यापैकी नेमके कोणत्या दिवशी श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करावा? असा प्रश्न भाविकांसमोर उपस्थित झाला आहे. 

यंदा राम नवमी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पूजा विधी या लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घेऊया...

राम नवमी 2026 कधी आहे? | When Is Ram Navami 2026 On 26th March Or 27th March>

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील नवमी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 वाजता सुरू होईल आणि 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 वाजता समाप्त होत आहे. अशा स्थितीत उदया तिथीनुसार 27 मार्च 2026 रोजी राम नवमी साजरी करणे अधिक शुभ मानले जाईल.

Advertisement

मध्यान्ह काळाची वेळ | Ram Navami 2026 Madhyaanha Kal Time 

राम नवमीच्या दिवशी मध्यान्ह काळाला विशेष महत्त्व असते, कारण श्रीरामाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता; अशी मान्यता आहे. यावर्षी मध्यान्हाची शुभ वेळ सकाळी 11:13 वाजेपासून ते दुपारी 1:57 वाजेपर्यंत असेल, तर मध्यान्हाचा अचूक क्षण दुपारी 12:44 वाजता मानला गेला आहे. या काळात पूजा करणे सर्वात उत्तम मानले जाते.

(नक्की वाचा: Kasturi Turmeric: राणी-महाराणींच्या सौंदर्याचे सीक्रेट, कस्तुरी हळद म्हणजे काय? काय आहेत फायदे? वाचा सविस्तर)

राम नवमी पूजा विधी | Ram Navami 2026 Puja Vidhi 

  • राम नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे.
  • सर्वप्रथम भगवान गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर एका स्वच्छ ठिकाणी भगवान श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी.
  • गंगाजलाने अभिषेक करावा आणि चंदन, अक्षता, फुले आणि वस्त्र अर्पण करावे.
  • यानंतर धूप-दीप लावून पूजा करावी आणि नैवेद्य अर्पण करावा. 
  • तुम्ही राम मंत्र किंवा रामायणाचे पठणही करू शकता.
  • शेवटी देवाकडे सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
  • राम नवमीच्या दिवशी घर सजवणे, नवीन कपडे घालणे आणि हवन करणे देखील शुभ मानले जाते.

राम नवमी कधी साजरी करावी? जाणून घ्या देशपांडे पंचांगानुसार माहिती... 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)