Mango Allergy Treatment At Home: उन्हाळ्याची मजा कैरी आणि आंब्याशिवाय अपूर्णच आहे. आंबट-गोड कैरीवर थोडे मीठ आणि तिखट लावून ताव मारणाऱ्यांची संख्या कमी नाही. तसेच उन्हाळ्यात थंडगार पन्हे प्यायला मिळाले तर मग वेगळाच आनंद... कैरीची चटणी असो वा लोणचे, कैरी प्रत्येक गोष्टीसाठी वापरली जाते, पण काही लोकांना कैरी खाल्ल्याने ओठांना खाज सुटणे, चेहऱ्यावर लाल पुरळ येणे, त्वचेवर सूज येणे किंवा फोड येणे यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. डॉक्टरांच्या मते, या समस्येचे कारण कैरीचा गर नसून कैरीची साल, देठाजवळील रस आणि चिकट पदार्थ असू शकतात; कारण यामध्ये असे रसायने असतात जे पॉयझन आयव्ही (एक प्रकारची विषारी वनस्पती) मधील ॲलर्जनसारखे असतात. याच कारणामुळे अनेक लोकांना ॲलर्जी होते.
कैरी खाल्ल्याने रॅशेज् का येतात?
कैरीच्या सालीमध्ये आणि त्याच्या रसामध्ये 'मंगोल' नावाचे एक रसायन आढळते, ज्यामुळे ॲलर्जी होऊ शकते. ही ॲलर्जी अनेकदा लगेच दिसून येत नाही, तर काही तासांनंतर परिणाम जाणवू लागतात. माहितीनुसार हे रसायन 'उरुशियोल' यासारखे असते, जे पॉयझन आयव्हीमध्ये आढळते. म्हणूनच ज्या लोकांना पॉयझन आयव्हीची ॲलर्जी असते, त्यांना कैरीच्या सालीमुळे देखील रिअॅक्शन होऊ शकते.
(नक्की वाचा : Jamun Benefits: उन्हाळ्यात मिळणारे 'हे' फळ मानले जाते डायबिटीजचा सर्वात मोठा शत्रू! कसे, कधी आणि किती खावे? वाचा)
कैरीची ॲलर्जी प्रामुख्याने या ठिकाणी असते
- कैरीच्या सालीमध्ये
- कैरीच्या देठाच्या (स्टेम) जवळ
- कैरी कापताना निघणारा चिकट रस
शरीरावर रॅशेस काही तासांत किंवा 48 तासांनंतर दिसू शकतात:
- ओठांवर किंवा तोंडाभोवती लाल, खाज सुटणारे रॅशेस येणे
- ओठ किंवा डोळ्यांना सूज येणे
- त्वचेवर जळजळ होणे
- त्वचेवर छोटे बारीक पुरळ येणे
- कैरी कापल्यानंतर बोटांवर किंवा हातावर रॅशेस येणे
- त्वचा कोरडी पडणे किंवा तिचे पापुद्रे निघणे
कोणत्या लोकांना याचा जास्त धोका असू शकतो?
खालील समस्या असणाऱ्या लोकांना कैरीपासून अॅलर्जी होऊ शकते
- संवेदनशील त्वचा
- पॉयझन आयव्हीची ॲलर्जी
- काजू किंवा पिस्त्याची ॲलर्जी
रॅशेस आल्यास काय करावे?
- प्रभावित झालेली जागा पाणी आणि सौम्य साबणाने स्वच्छ धुवावी
- थंड पाण्याच्या पट्टीने शेक द्यावा
- सुगंध नसलेले मॉइश्चरायझर लावावे
- त्वचा खाजवू नये
- गरज भासल्यास अँटीहिस्टामाइन औषध घ्यावे
- डॉक्टरांनी दिलेली क्रीम लावावी
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world