Psychology Of Hmmm Text: तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का? की तुम्ही तुमच्या पार्टनरला एक मोठा मेसेज लिहून पाठवला, त्याद्वारे आपल्या मनातील भावना किंवा दिवसभराची हकीकत सांगितली आणि समोरून उत्तरात फक्त एकच शब्द आला – 'Hmm' (हम्म)? खरं तर हा फक्त एक शब्द नाही, तर अनेकदा हा समोरच्या व्यक्तीचा मूड आणि तुमच्या नात्याच्या परिस्थितीचा एक मोठा संकेत असू शकतो. जेव्हा पार्टनर वारंवार फक्त 'हम्म' लिहून संभाषण तिथेच संपवून टाकतो, तेव्हा मनात अनेक प्रकारचे प्रश्न फिरू लागतात. हम्म वाचून अनेकदा तर समोरच्या व्यक्तीचे डोके खूप खराब होते. अशा परिस्थितीत काही वेळा नात्यात वाद आणि भांडणे देखील सुरू होतात. नातं टिकवण्यासाठी आणि या सवयीपासून दूर राहण्यासाठी काय करावे? याबाबतची सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया...
नुकतेच इन्स्टाग्रामवर psychologist_santhoshini यांनी या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर पार्टनर काही बोलत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो तुमच्याकडे दुर्लक्ष (Ignore) करत आहे किंवा खोटे बोलत आहे. अनेकदा संबंधित विषयावर काय बोलावे हे त्याला काही समजत नसते. म्हणूनच तो शांत राहणे पसंत करतो.
पार्टनरच्या 'हम्म' या उत्तरामागे काय कारणे असू शकतात?
1. भावनिक अंतर किंवा टाळाटाळ (Emotional distance or avoidance):
सायकॉलॉजीनुसार काही लोक आपल्या भावना शब्दांत व्यक्त करण्याचे टाळतात. जेव्हा ते एखाद्या संभाषणात त्यांना कर्म्फटेबल (Comfortable) वाटत नाही किंवा बोलणे खूप सखोल किंवा गंभीर होत आहे, तेव्हा ते 'हम्म' लिहून एक सुरक्षित अंतर निर्माण करतात. सायकॉलॉजीमध्ये याला 'इमोशनल स्पेस' तयार करणे असेही म्हणतात.
2. थकवा आणि लक्ष नसणे:
असे असू शकते की तुमचा पार्टनर ऑफिसच्या कामात व्यस्त असेल एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असेल किंवा दिवसभराच्या धावपळीनंतर इतका थकला/थकली असेल की त्याच्याकडे मोठा रिप्लाय टाइप करण्याची ऊर्जाच उरली नसेल. अशा वेळी 'हम्म'चा अर्थ फक्त एवढाच असतो की, 'मी तुझा मेसेज पाहिला आहे, पण सध्या मी बोलण्याच्या स्थितीत नाही.'
(नक्की वाचा : Pseudomenstruation: नवजात मुलींना मासिक पाळी का येते? स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणजे काय? डॉ घावडेंनी सांगितलं कारण)
3. चॅटिंग स्टाइल:
प्रत्येकाची बोलण्याची पद्धत एकसारखी नसते. तुमच्यासाठी चॅटिंग हे मनातील बोलण्याचे माध्यम असू शकते, पण तुमच्या पार्टनरसाठी ते फक्त कामाच्या गोष्टी शेअर करण्याचे साधन असू शकते. अशी लोक संभाषण वाढवण्याऐवजी 'हम्म' किंवा 'ओके' लिहून गोष्ट संपवणे पसंत करतात.
ही सवय नात्यावर कसा परिणाम करते?
जर हे कधीतरी घडत असेल तर यात मोठी गोष्ट नाही. पण जर तुमचा पार्टनर प्रत्येक दुसऱ्या गोष्टीवर फक्त 'हम्म'च लिहित असेल तर हे नात्यातील संवादामधील अंतर (कम्युनिकेशन गॅप) दर्शवते.
(नक्की वाचा : Von Willebrand Disease: महिलांनो सावधान! किरकोळ दुखापतीनंतरही रक्त थांबत नाहीय? तर असू शकतो हा धोकादायक आजार)
ही परिस्थिती कशी हाताळावी?
1. मोकळेपणाने बोलणे: जेव्हा पार्टनर चांगल्या मूडमध्ये असेल, तेव्हा त्यांना प्रेमाने सांगा की जेव्हा ते फक्त 'हम्म' लिहितात, तेव्हा तुम्हाला कसे वाटते.
2. विचारण्याची पद्धत: असे प्रश्न विचारा ज्यांचे उत्तर फक्त हो, नाही किंवा 'हम्म' मध्ये देता येणार नाही. जसे की, 'आजचा दिवस कसा गेला?' याऐवजी विचारा, 'आज ऑफिसमध्ये सर्वात मजेशीर काय घडले?'
3. फोन कॉल: जर कोणतीही महत्त्वाची किंवा गंभीर गोष्ट बोलायची असेल तर चॅटिंगमध्ये अडकण्याऐवजी थेट कॉल करा.
संशोधन काय सांगते (रीसर्च)?
'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे कपल्स आपल्या चॅटिंगमध्ये टेक्स्टसोबत इमोजी (Emojis) चा वापर करतात, त्यांना आपल्या नात्यात अधिक जवळीक आणि समाधान जाणवते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)