जाहिरात

Pseudomenstruation: नवजात मुलींना मासिक पाळी का येते? स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणजे काय?डॉ घावडेंनी सांगितलं कारण

What Is Pseudomenstruation: नवजात मुलींच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव दिसल्यास पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित घावडे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Pseudomenstruation: नवजात मुलींना मासिक पाळी का येते? स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणजे काय?डॉ घावडेंनी सांगितलं कारण
"What Is Pseudomenstruation: स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणजे काय?"
Canva
  • नवजात मुलीच्या जन्मानंतर 2 ते 10 दिवसांच्या आत दिसणारा रक्तस्राव स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणून ओळखला जातो
  • स्युडो मेंस्ट्रुएशन ही प्रक्रिया नैसर्गिक आहे
  • स्युडो मेंस्ट्रुएशनमुळे लाल, गुलाबी किंवा तपकिरी रंगाचा थोडासा रक्तस्राव होऊ शकतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

- डॉ. अमित घावडे, बालरोगतज्ज्ञ

What Is Pseudomenstruation: नवजात मुलीच्या योनीमार्गातून थोडासा रक्तस्त्राव दिसल्यास पालकांची घाबरगुंडी उडते. अनेकांना हे गंभीर आजाराचे लक्षण वाटते. पण जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत नवजात मुलींमध्ये दिसणारा हा रक्तस्त्राव बहुतेक वेळा ‘स्युडो मेंस्ट्रुएशन' (Pseudo Menstruation) म्हणून ओळखला जातो आणि हे अगदी सामान्य आहे.

तज्ज्ञांच्या मते गर्भावस्थेदरम्यान आईच्या शरीरातील इस्ट्रोजेन (Estrogen) हे हार्मोन बाळाच्या शरीरातही पोहोचते. जन्मानंतर हे हार्मोन अचानक कमी झाल्याने नवजात मुलीच्या गर्भाशयाच्या आतील आवरणात बदल होतात आणि त्यातून अत्यल्प प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. हा रक्तस्त्राव साधारणपणे जन्मानंतर 2 ते 10 दिवसांच्या कालावधीत दिसून येतो.

स्युडो मेंस्ट्रुएशन म्हणजे काय? What Is Pseudomenstruation?

स्युडो मेंस्ट्रुएशन हा नवजात मुलींमध्ये आढळणारा तात्पुरता आणि नैसर्गिक रक्तस्त्राव आहे. ही मासिक पाळी नसून आईच्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे निर्माण होणारी प्रतिक्रिया आहे. साधारणतः काही प्रमाणात लाल किंवा गुलाबी रंगाचा स्त्राव दिसू शकतो तसेच ही प्रक्रिया काही दिवसांत आपोआप थांबतो.

स्युडो मेंस्ट्रुएशन मागील कारणे | Pseudomenstruation Causes In Marathi

  • गर्भावस्थेत आईकडून बाळापर्यंत पोहोचणारे इस्ट्रोजेन हार्मोन
  • जन्मानंतर हार्मोनची पातळी अचानक घटणे
  • गर्भाशयाच्या आतील आवरणातील नैसर्गिक बदल
  • नवजात शरीराची हार्मोनल जुळवाजुळव

स्युडो मेंस्ट्रुएशन प्रक्रिया सुरू असताना कोणती लक्षणे दिसू शकतात? | Pseudomenstruation Symptoms

  • डायपरमध्ये रक्ताचे काही थेंब दिसणे
  • गुलाबी किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव
  • योनीमार्गातून पांढऱ्या रंगाचा स्त्राव
  • बाह्य जननेंद्रियावर हलकी सूज

तज्ज्ञांच्या मते ही लक्षणे काही दिवसांत आपोआप कमी होतात.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

  • बाळाच्या जननेंद्रियाची स्वच्छता राखावी.
  • वारंवार डायपर बदलावा.
  • रक्तस्रावाचे प्रमाण लक्षात ठेवावे.
  • स्वतःच्या मनाने कोणत्याही औषधांचे सेवन किंवा घरगुती उपचार करू नका.
  • नाजूक भागाची स्वच्छता करताना तो भाग जास्त प्रमाणात घासू नका.

खालील लक्षणं आढळल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या 

  • रक्तस्त्राव खूप जास्त प्रमाणात होत असेल
  • सात ते 10 दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव सुरू असेल
  • दुर्गंधीयुक्त स्त्राव येत असेल
  • ताप, सुस्ती किंवा स्तनपान कमी होणे अशी लक्षणे असतील
  • जननेंद्रियावर जखम, सूज किंवा संसर्गाची चिन्हे दिसत असतील

 डॉ. कांचन जोशी यांनी शेअर केलेला व्हिडीओ ऐका

स्युडो मेंस्ट्रुएशनबाबत डॉक्टर काय सांगतात?

नवजात मुलींमध्ये दिसणारे स्युडो मेंस्ट्रुएशन हे बहुतेक वेळा पूर्णपणे नैसर्गिक आणि निरुपद्रवी असते. आईच्या हार्मोन्सचा प्रभाव कमी होताना काही दिवस हलका रक्तस्त्राव दिसू शकतो. पण हा रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत असेल, दीर्घकाळ टिकत असेल किंवा त्यासोबत इतर असामान्य लक्षणं दिसून येत असतील तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,असे बालरोगतज्ज्ञ अमित घावडे यांनी सांगितले.

नवजात मुलींमध्ये दिसणारा हा रक्तस्त्राव म्हणजे कोणताही आजार, भविष्यातील हार्मोनल समस्या किंवा लवकर पाळी सुरू होण्याचे लक्षण नसते. बहुतांश प्रकरणांमध्ये ही एक नैसर्गिक आणि तात्पुरती अवस्था असते.

(Dr Amit P Ghawade, Consultant- Pediatrician and Neonatologist, Kharghar, Navi Mumbai)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com