Republic Day 2026 Speech : शाळेत भाषण देऊन गाजवायचा आहे प्रजासत्ताक दिन? मग हे घ्या जबरदस्त स्पीच

Republic Day Speech in Marathi: 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यासाठी संपूर्ण भाषण घ्या. या आधारावर तयारी केली तर सर्वच करतील तुमची वाहवा

जाहिरात
Read Time: 3 mins
Republic Day 2026 Speech : 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे.
मुंबई:

Republic Day Speech in Marathi: 26 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार असून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दिल्लीच्या कर्तव्य पथापासून ते गल्लीबोळापर्यंत जय्यत तयारी सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला असला तरी, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतरच देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्राचा दर्जा मिळाला. भारताची लोकशाही मूल्ये आणि संविधानाने दिलेले हक्क यांचा जागर करणारा हा दिवस यंदाही देशाच्या वाढत्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

या भाषणासाठी महत्त्वाचे 10 मुद्दे खालीलप्रमाणे आहेत

1. 26 जानेवारी 1950 या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीचे योगदान.
3. भारतीय लोकशाहीची जगात असलेली प्रतिमा.
4. मूलभूत अधिकार आणि नागरिकांची कर्तव्ये.
5. भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि सीमा सुरक्षा.
6. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताची प्रगती.
7. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील क्रांती.
8. शिक्षणाचे महत्त्व आणि युवकांचे भविष्य.
9. सामाजिक एकता आणि अखंडता राखणे.
10. विकसित भारत 2047 चा संकल्प.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यासाठी संपूर्ण भाषण (Republic Day  2026 Speech)

26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी आपण आपल्या देशाचे संविधान स्वीकारले, जे जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक संविधान मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून मिळालेले हे संविधान प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याची आणि प्रगती करण्याची समान संधी देते. लोकशाहीचा हा उत्सव आपल्याला आठवण करून देतो की, या देशाची सत्ता कोणा एकाच्या हाती नसून ती जनतेच्या हाती आहे.

( नक्की वाचा : Republic Day 2026 : कोण आहेत भारतीय सैन्याचे 'भैरव'? प्रजासत्ताक दिनी दिसणार भारताची शक्ती! वाचा सर्व माहिती )

आज जेव्हा आपण 26 जानेवारी साजरा करण्याची तयारी करत आहोत, तेव्हा आपण भारताने गेल्या 7 दशकं आणि 7 वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे आहे. अंतराळ क्षेत्रात इस्रोने लावलेली झेप असो किंवा जगाची आर्थिक महासत्ता बनण्याकडे सुरू असलेली भारताची वाटचाल, या सर्व यशाचा पाया आपल्या लोकशाही व्यवस्थेत आहे. मात्र, ही प्रगती खऱ्या अर्थाने यशस्वी तेव्हाच होईल, जेव्हा देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचतील.

Advertisement

सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताची भूमिका अत्यंत कळीची ठरत आहे. आपण केवळ स्वतःचा विचार न करता 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेतून जगाला शांतता आणि सहकार्याचा संदेश देत आहोत. हवामान बदल असो वा जागतिक आरोग्य संकटे, भारताने नेहमीच पुढाकार घेऊन मदत केली आहे. ही जागतिक प्रतिष्ठा आपल्या संविधानाने दिलेल्या नैतिक मूल्यांमुळेच आपल्याला प्राप्त झाली आहे, ज्याची जाणीव प्रत्येक तरुणाला असणे गरजेचे आहे.

येणाऱ्या काळात भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत नेण्यासाठी युवकांनी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. केवळ साक्षर होऊन चालणार नाही, तर आपल्याला नवनवीन संशोधनाद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना तो विधायक कामासाठी व्हावा आणि समाजातील विषमता दूर करण्यासाठी व्हावा, हेच खरे आधुनिक प्रजासत्ताकाचे स्वप्न आहे. आपल्या देशाची ताकद ही आपली लोकसंख्या नसून ती आपली प्रतिभावान युवा शक्ती आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Republic Day 2026: झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहण यामध्ये काय आहे फरक? कधी विचार केलाय? )

देशाप्रती असलेले प्रेम केवळ भाषणातून नाही तर आपल्या कृतीतून दिसून आले पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून कायद्याचे पालन करणे, आपल्या परिसराची स्वच्छता राखणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे ही आपली प्राथमिक कर्तव्ये आहेत. येणाऱ्या 26 जानेवारीला आपण केवळ तिरंगा फडकवून थांबायचे नाही, तर हा देश अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. चला तर मग, या प्रजासत्ताक दिनी एक नवा संकल्प करूया आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध होऊया.
 

Topics mentioned in this article