जाहिरात

Rishi Panchami 2025: ऋषि पंचमी कधी आहे? पूजा सामग्री, पूजा विधी, सणाचे महत्त्व, व्रताचे लाभ जाणून घ्या

Rishi Panchami 2025: ऋषि पंचमीची कधी आहे, पूजा कशी करावी यासह सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या..

Rishi Panchami 2025: ऋषि पंचमी कधी आहे? पूजा सामग्री, पूजा विधी, सणाचे महत्त्व, व्रताचे लाभ जाणून घ्या
"Rishi Panchami 2025: ऋषि पंचमी कधी आहे? पूजा कशी करावी?"

Rishi Panchami 2025 Date: भाद्रपद शुद्ध पंचमी तिथीला ऋषि पंचमी साजरी केले जाते. ऋषिंविषयीची निष्ठा, आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सप्तर्षी, अरुंधती आणि गणपती देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी व्रत देखील केले जाते. ऋषि पंचमीचे व्रत (Rishi Panchami 2025) केल्यास जीवनामध्ये कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त होते, असे म्हणतात.  यंदा ऋषि पंचमी कधी आहे, पूजा कशी करावी? यासह व्रताबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

ऋषि पंचमी 2025 कधी आहे?| When Is Rishi Panchami 2025 Date

यंदा ऋषि पंचमी 28 ऑगस्ट रोजी आहे.

ऋषि पंचमीच्या दिवशी काय खाऊ नये?

ऋषि पंचमीच्या दिवशी बैलांच्या श्रमाच्या कोणत्याही गोष्टी वापरू नये.  तर याऐवजी स्वतःच्या कष्टाने पिकवलेले धान्य, भाजीफळांचा आहार घ्यावा आणि नैवेद्यासाठीही याच गोष्टींचा समावेश करावा असे म्हणतात.  

ऋषि पंचमीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य | Rishi Panchami 2025 Puja Samagri List

  • हळद कुंकू
  • गुलाल, रांगोळी
  • गंध, फुले
  • दुर्वा-तुळशी
  • कापूर, अक्षता
  • उदबत्ती, विड्यांची पाने 25
  • सुपाऱ्या 35, एक नारळ 
  • खारीर 10, बदाम 10 
  • खोबऱ्याच्या वाट्या दोन, गूळ-खोबरे 
  • सुवासिक तेल, केळी, पेरू इत्यादी फळे
  • पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), गोमूत्र
  • गोमय, आघाडा, निरांजन, हिरव्या बांगड्या पाच
  • एक गळेसरी, जानवीजोड दोन, एक पंचा, एक खण 
  • शेंदूर, बुक्का, कापसाची वस्त्रे, काडवांती

पत्री : अगस्त्याची दोन पाने, वडाची दोन पाने, पिंपळाची दोन पाने, रुईची दोन पाने, आघाड्याची दोन पाने, ताडपत्र, केवडा, अरुंधतीला अनेक प्रकारची पत्री, ऋषींना नैवेद्य, फराळाचे ऋषिपंचमीचे जे पदार्थ मिळतात त्यांचा नैवेद्य करावा.

सौभाग्यवान

एक कोरी सुपारी, एक खण, एक श्रीफळ, एक कंगवा, एक करंडा, पाच हिरव्या बांगड्या, एक गळेसरी, तांदूळ, सुपारी, विडा, दक्षिणा (संपूर्ण वायनातील पदार्थ देणे शक्य नसल्यास 21/51 रुपये दक्षिणा द्यावी.)

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पा विघ्न दूर कर, आयुष्यास दे नवसंजीवनी! गणेश चतुर्थीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पा विघ्न दूर कर, आयुष्यास दे नवसंजीवनी! गणेश चतुर्थीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

ऋषि पंचमी पूजा कशी करावी? | Rishi Panchami 2025 Puja Vidhi 

  • पूजा करायची जागा स्वच्छ करुन घ्यावी. 
  • पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढावी. 
  • पाटावर ओळीने तांदळाच्या आठ पुंज्या तयार करुन कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि ऋषि वसिष्ठ यांची पत्नी अरुंधती यांच्या नावाने एक-एक सुपारी ठेवावी.
  • बाजूलाच तांदूळ घेऊन त्यावर एक सुपारी गणपती म्हणून ठेवावी. 
  • घरच्या देवांना नमस्कार करुन पूजेला बसावे.
  • संकल्प करावा.
  • पाटावर मांडलेल्या सर्व सुपाऱ्यांवर पाणी अर्पण करुन अक्षताही वाहावी.

गणपती पूजन (Ganesh Pujan)

  • गणपतीस हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करावी. 
  • निरांजन ओवाळावे. विडा पान सुपारीवर पाणी वाहावे. 
  • गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

कलश पूजन (Kalsh Pujan)

शुद्ध पाण्याने भरलेल्या कलाशामध्ये गंध, अक्षता, पुष्प, तुळशीपत्र ठेवावे आ प्रार्थना करावी. 

घंटा पूजा (Ghanta Pujan)

घंटेला स्नान घालून त्यावर गंध, पुष्प आणि अक्षता वाहाव्या. हळदकुंकू वाहून नमस्कार करावा. 

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes: मोदकासारखी गोडी, दुर्व्यासारखी शुद्धता आयुष्यात असो! गणेश चतुर्थीच्या पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes: मोदकासारखी गोडी, दुर्व्यासारखी शुद्धता आयुष्यात असो! गणेश चतुर्थीच्या पाठवा खास शुभेच्छा)

प्रोक्षण 

कलशातील पाणी तुळशीपत्राने किंवा दुर्वांकुराने सर्व साहित्यासह स्वतःवरही प्रोक्षण करावे. 

ध्यान, आवाहन

पूजेच्या पाटावर मांडलेल्या सुपाऱ्यांवर पुष्प अर्पण करावे आणि हात जोडावे.

  • यानंतर आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, मलापकर्ष,पय, दधि, घृत, मधु, शर्करा, गंधोदकस्नान, वस्त्रादी पूजा, यज्ञोपवीत, गंध, अलंकार, फुले, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणाही ठेवून 16 उपचार करुन पूजा करावी.
  • अरुंधतीची पूजा: मंगळसूत्र, बांगड्या, हळद, कुंकू, काजळ, अलंकार, परिमलद्रव्ये, फुले, पत्रीची पूजा करावी. 
  • अथतथैवनामपूजा: धूप, दीप, नैवेद्य, फळे, तांबूल, महादक्षिणा, निरांजन, प्रदक्षिणा, पुष्पांजली प्रार्थना, अशी पद्धतीने पूजा करावी. 
  • सप्तर्षींची आरती करा आणि व्रत कथा देखील ऐकावी. 
  • पूजाविधी पार पडल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. 

ऋषि पंचमी व्रताची पारण विधी |Rishi Panchami Paran Vidhi 

  • दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करुन देवी-देवतांचे ध्यान करावे. 
  • सूर्यदेवास जल अर्पण करावे. 
  • देवासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. सप्तर्षींची आरती करावी.  
  • सप्तर्षींना नैवेद्य अर्पण करावा. 
  • गरजवंतांना दान करावे. 
  • दुसर्‍या दिवशी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.

ऋषि पंचमीच्या व्रताचे महत्त्व |Rishi Panchami 2025 Importance

1. ऋषिपंचमीचे व्रत केल्यास सप्तर्षींचा आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात. 
2. महिलांसाठी हे व्रत अधिक फलदायी असते, असेही म्हणतात. 
3. ऋषिपंचमीचे व्रत केल्यास जीवनात शिस्त आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com