जाहिरात

Rishi Panchami 2025 Recipe: ऋषी पंचमी 2025 | ऋषीची भाजी रेसिपी Video

Rishi Panchami 2025 Recipe| Rushi Bhaji Recipe: ऋषि पंचमीनिमित्त सात्विक पद्धतीने ऋषीची भाजी तयार करण्याची परंपरा आहे. घरच्या घरी ऋषीची भाजी कशी तयार करायची जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी...

Rishi Panchami 2025 Recipe: ऋषी पंचमी 2025 | ऋषीची भाजी रेसिपी Video
Rishi Panchami 2025 Recipe| Rushi Bhaji Recipe: ऋषीच्या भाजीची रेसिपी

Rishi Panchami 2025 Recipe In Marathi| Rushi Bhaji Recipe: भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमी तिथीला ऋषि पंचमी 2025 साजरी केली जाते. या दिवशी सात्विक भोजन करण्याची परंपरा आहे. ऋषि पंचमीला घरोघरी ऋषीची पौष्टिक भाजी तयार केली जाते. ही भाजी तयार करण्यासाठी कोणकोणत्या भाज्यांचा समावे करावा आणि भाजी कशी तयार करावी, याची स्टेप बाय स्टेप पाककृती जाणून घेऊया...

ऋषीची भाजी रेसिपी |Rushi Bhaji Recipe In Marathi| Rushi Sabji Recipe In Marathi 

ऋषीची भाजी तयार करण्यासाठी लागणारी सामग्री | Rishi Bhaji Ingredients

  • अळूची पाने 
  • लाल माठ 
  • कांद्याची पात 
  • लाल माठाचा देठ 
  • अळूचा देठ 
  • गवार  
  • फरसबी 
  • कारले 
  • पडवळ  
  • घेवडा 
  • गाजर  
  • भेंडी 
  • पावटा 
  • दोडके 
  • शेवग्याच्या शेंगा 
  • मका  
  • सुरण  
  • भोपळा 
  • आंबाडा  
  • कच्ची केळी  
  • रताळे 
  • शेंगदाणे 
  • मिरची 
  • चवीसाठी मीठ 
  • आवश्यकतेनुसार पाणी  
  • चिंचेचा कोळ 
  • किसलेले खोबरे 

Rishi Panchami 2025 Wishes: श्रद्धा, संयम आणि ज्ञानाची प्रेरणा, ऋषि पंचमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Rishi Panchami 2025 Wishes: श्रद्धा, संयम आणि ज्ञानाची प्रेरणा, ऋषि पंचमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा)

ऋषीच्या भाजीची पाककृती | Rushi Bhaji Recipe In Marathi 

  • सर्वप्रथम वरील भाज्या स्वच्छ धुवा.
  • एक-एक करुन सर्व भाज्या चिरुन घ्या.
  • भाजी तयार करण्यासाठी एक मोठे भांडे घ्यावे. 
  • भांड्यामध्ये सर्व भाज्या एकत्र करा. 
  • भाज्यांवरुन मीठ, मिरची घालावी आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतावे.
  • भांड्यावर झाकण ठेवून भाज्या व्यवस्थित वाफवून घ्यावा. 
  • सर्व भाज्या शिजल्यानंतर वरुन चिंचेचा कोळ आणि खोबरे घालून भाजी पुन्हा अगदी थोड्या वेळासाठी वाफवावी. 
  • ऋषीची पौष्टिक भाजी तयार आहे. 


ऋषीची भाजी खाल्ल्यास आरोग्यास अगणित पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Video Credit Insta @ me_haay_foodie / Swaad Saasu Sunecha

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com