कमी झोपेमुळे 'Silent Epidemic' चा धोका, काय आहे हा आजार?

मात्र अधिकांश लोक सात ते आठ तासांची झोप घेत नाही, याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

फिटनेस, चांगला आहार आणि व्यायमाचं महत्त्व आपण सर्वजणं जाणतो. मात्र लोक पुरेशी झोप घेण्याला कमी महत्त्व देतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आणि शारिरीक स्वास्थासह पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या झोपेमुळे जीवन आनंदी राहतं आणि कार्यक्षमता वाढते. मात्र अधिकांश लोक सात ते आठ तासांची झोप घेत नाही, याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. 

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार  (NAFLD) चार प्रौढ अमेरिकन लोकांपैकी एकापेक्षा जास्त लोकांमध्ये आढळतो. झोपेच्या कमतरतेमुळे या आजाराची लागण  होऊ शकते. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, काही डॉक्टर याला सायलेंट एपिडेमिक म्हणतात. यकृतातील चरबीतून NAFLD ची लागण झाली आहे की नाही याची माहिती मिळते. MNGI डायजेस्टिव्ह हेल्थचे डॉक्टर इब्राहिम हनौनेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब, उच्च ट्राइग्लिसराइड्स, टाइप 2 मधुमेह आणि ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया सारख्या जोखीम वाढवणाऱ्या कारणांशिवाय वाढलेलं वजन मुख्य कारण आहे.   

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार कसा होतो?
जास्त अल्कोहोल पिण्यामुळे देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो. परंतु NAFL हा एक फॅटी लिव्हर डिसऑर्डर आहे. जो मेटाबॉलिक सिंड्रोमच्या स्थितीत उद्भवतो. याशिवाय जास्त वजन असेल तरी हा धोका असतो. त्यामुळे याला  'नॉन-अल्कोहोलिक' म्हटलं जातं. त्यांनी पुढे सांगितलं की, काही अभ्यासांमध्ये, फॅटी लिव्हरमुळे सामान्य लोकसंख्येच्या 25% ते 33% लोकांवर परिणाम झाला आहे. विशेषत: सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे चार लोकांपैकी एक आणि बहुतेक व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. काही लोकांना थकवा, स्मरणशक्ती कमी होणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. पोटदुखीचा त्रास हा यकृत सिरोसिस आणि यकृत कर्करोगाच्या वाढीशी आहे.

Advertisement

अपूऱ्या झोपेमुळे समस्येत वाढ...
अनेक अभ्यासानुसार, अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढणे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होण्याची शक्यता असते. यातही मेनोपॉजनंतरच्या महिलांना याचा अधिक धोका असतो. एका अभ्यासानुसार, अपुरी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये सामान्यांच्या तुलनेत इन्शुलिनचा स्तर अधिक होता. याशिवाय टाइप 2 डायबिटीज आजारात NAFLD विकसित होण्याचा धोका वाढतो. वजन नियंत्रित करण्यासाठीही पुरेशी झोप आवश्यक आहे. 

Advertisement

(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. हा कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )