सर्वपित्री दर्श अमावस्या कधी आहे? या दिवशी पितृ चालीसाचे पठण करणे मानले जाते अतिशय शुभ

Sarva Pitru Amavasya Date: सर्वपित्री दर्श अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो, असे मानले जाते. 

Advertisement
Read Time: 2 mins

Pitru Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते. सर्वपित्री दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो, असे म्हणतात. या दिवशी स्नान आणि दान करण्यासह पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांची पूजा केली जाते. यंदा सर्वपित्री अमावस्या कोणत्या दिवशी आहे आणि या दिवशी पितरांची पूजा करण्याचे काय महत्त्व आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

सर्वपित्री अमावस्या कधी आहे?| Sarva Pitru Amavasya Date

यंदा 2 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते, अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. सर्वपित्री दर्श अमावस्येला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते. असे केल्यास पितर सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात, अशी मान्यता आहे. या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पितरांचा रागही दूर होतो, असे म्हणतात. तसेच सर्वपित्री दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केल्यानंतर पितृ चालीसा पाठ करणेही शुभ असते.

(नक्की वाचा: Vastu Tips: महालक्ष्मीचा आशीर्वाद हवाय? हे उपाय ठरतील फलदायी)

पितृपक्षामध्ये खालील गोष्टी लक्षात ठेवा 

- पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान करू नये. लसूण कांद्याचा वापर करणे टाळावे.
- धार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी करणे टाळावे
- कोणाकडून उसणे पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये.
- घराच्या डागडुगीचे काम करणे टाळा.
- नवीन कपडे, दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणे टाळा.  
- खोटे-फसवणुकीचे कार्य करणे टाळावे. 
- स्वतःच्या सामर्थ्यानुसार गरजूंची मदत करावी. 
- घराच्या छतावर स्वच्छ भांड्यामध्ये पाणी, अन्न आणि गोड पदार्थ ठेवावा. 

(नक्की वाचा: हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.